निरगुडसर : आठ दिवस गुंगारा देणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील चोळीचा मळ्यामध्ये पहाटे(ता.२१) रोजी घडली,बिबट्यामुळे परिसरात घबराट पसरली होती अशा परिस्थितीत बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
निरगुडसर येथील चोळीचा मळ्यात भरदुपारी बिबट्या आला आणि डोळ्यादेखत ओट्यावर बसलेल्या कुत्र्याला घेऊन गेला,हा थरकाप उडविणारा क्षण बुधवार (ता.१०) रोजी घडला,यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली,या ठिकाणी जवळच असलेल्या अंगणवाडीत चिमुकले मुले शिक्षण घेतात त्यामुळे याठिकाणी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य वैभव वळसे पाटील यांच्या सह ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती,
याबाबत पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांनी वनविभागाकडे पाठपुरावा केल्या नंतर वनविभागाने निरगुडसर येथील चोळीचा मळा येथे शनिवार (ता.१३) रोजी रात्री शेतकरी सयाजी बबनराव वळसे पाटील यांच्या शेतात पिंजरा लावला होता,
यासाठी दररोज बिबट्यासाठी भक्ष ठेवण्यात येत होते परंतु बिबट्या गुंगारा देत होता पण अखेर आठ दिवसाने रविवार (ता.२१) रोजी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला,रविवारी सकाळी शेतकरी दत्ता गायकवाड हे पिंजऱ्याकडे गेले असता बिबट्या पिंजऱ्यात अडकलेला दिसला त्यानंतर त्यांनी तातडीने याबाबतची माहिती वनविभागाला कळवली.
माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी,रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला ताब्यात घेतले,पिंजऱ्यात अडकल्यानंतर बिबट्याने पिंजऱ्याला धडक्या दिल्याने त्याच्या नाकाला आणि डोक्याला थोडा मार लागला आहे,
यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती,बिबट्याला पकडल्यामुळे नागरिक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच निरगुडसर परिसरात अजूनही बिबटे असून ते पण वनविभागाने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.