राहू - राहू बेटपरिसर (ता. दौंड) परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मोठया प्रमाणात वावर वाढल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी राहूचे सरपंच दिलीप देशमुख, वडगावबाड्यांच्या सरपंच श्रद्धा मेमाणे, पाटेठाणच्या सरपंच उषा पिंपळे, पिलानवाडीच्या सरपंच वैशाली डुबे, उंडवडीच्या सरपंच दीपमाला जाधव, वाळकीच्या सरपंच ज्योती थोरात, नाथाचीवाडीच्या सरपंच सारिका चोरमले, पिंपळगावच्या सरपंच शुभांगी पासलकर, खामगाव चे सरपंच योगेश मदने, नांदूरचे सरपंच युवराज बोराटे, दहिटण्याच्या सरपंच आरती गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. मात्र पिंजरा लावण्यास वन विभागाकडून सोयीस्कर टाळाटाळ होत आहे, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
काल मध्यरात्रीच्या सुमारास वडगाव बांडे-राहू शिव रस्त्यावरील भाऊ बाळू मोटे यांच्या दोन बकऱ्यांचा मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने फडशा पडला. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे. दोन दिवसापूर्वी राहूनजिक एका बाजरीच्या शेतात बिबट्या वावरताना शेतकऱ्यांनी पाहिला.
सोनवणे मळा परिसरात देखील बिबट्याचे सायंकाळच्या सुमारास नागरिकांना दर्शन होत आहे. शेतामध्ये अनेक ठिकाणी त्याच्या पायाचे ठसे देखील शेतकऱ्यांना आढळून आले आहे. राहू-वाघोली रस्त्याच्या कडेला बिबट्या वावरताना दिसला. गाडीच्या उजेडामुळे त्याने उसाच्या शेताकडे धूम ठोकली. यापूर्वी राहू परिसरामध्ये अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करत फस्त केले.
शेतात काम करत असताना शेतमजुरांना तसेच ग्रामस्थांना अचानक बिबट्या दिसत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरे लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायतीने त्वरित कागदपत्रांची वन विभागाच्या कार्यालयाकडे पूर्तता करून देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पिंजरे लावण्यास टाळाटाळ होत आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावला जाईल असे गोड आश्वासन वन विभागाच्या वतीने ग्रामस्थांना दिले जात आहे.
नागरिकांनी सतर्क रहा, घरा भोवताली विजेचे दिवे चालू ठेवा, अधून-मधून फटाके वाजवा, बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये, असे आव्हान वन विभागाने केले आहे.
दरम्यान, दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, परिसराची तातडीने पाहणी करून पिंजरा लावण्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला कळवले जाईल.
पिंजरा लावण्यास टाळाटाळ..!
राहू परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पासून बिबट्याचा वावर आहे. वन विभागाला अनेकदा कळूनही पिंजरा लावण्यास सोयीस्कर टाळाटाळ केली जात आहे. असे परिसरातील नागरिकांनी सकाळ शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.