पुणे : राज्य शासनाने मराठा समाजाचा समावेश सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास (एसईबीसी) तर कुणबी समाजाचा समावेश इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) यामध्ये केला आहे. मराठा, कुणबी , कुणबी- मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी व ओबीसीचे दाखले दिले जातात. हे दाखले वेळेत विद्यार्थ्यांना मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तालुकानिहाय एसईबीसी आणि ओबीसी दाखल्यांसाठी किती अर्ज आले, किती दाखल्यांचे वितरण केले आणि प्रलंबित राहिलेले अर्ज किती यांची माहिती सारथीकडून दर महिन्याला घेतली जाणार आहे.
ओबीसी आणि एसईबीसीचे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती करता यावी. तसेच दाखल्यांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची मदत व्हावी, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एसईबीसीचे दाखले मिळून सारथी संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ घेता येईल, या उद्देशाने संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र दिले आहे.
सारथी संस्था ही मराठा, कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आली आहे. सारथी संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एसईबीसी अथवा ओबीसी दाखला असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत इयत्ता १०वी आणि १२ वीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी दाखल्यांची आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी कागदपत्रे कोणती, याची माहिती विद्यार्थांना देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी.
तसेच दाखले वेळेत मिळण्यासाठी प्रांताधिकारी, तहसिलदार यांना सूचना द्याव्यात, अशी विनंती काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच तालुकानिहाय मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या, दाखल्यांसाठी केलेल्या अर्जांची संख्या, दिलेले दाखले आणि प्रलंबित राहिलेले अर्ज यांची माहिती दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत ई-मेलने देण्याच्या सूचना काकडे यांनी दिल्या आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एसईबीसी आणि ओबीसी या दाखल्यांसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. याची माहिती www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनही सारथीच्या वतीने करण्यात आले आहे.
(Edited by Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.