Wagholi News : वाघोली समस्याबाबत अनेकांकडून गडकरी, पवार यांना निवेदने Sakal
पुणे

Wagholi News : वाघोली समस्याबाबत अनेकांकडून गडकरी, पवार यांना निवेदने

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : प्रचाराच्या सभेसाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नागरिकांनी व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाघोलीच्या समस्या संदर्भात अनेक निवेदने दिली.

महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री अजित पवार वाघोलीत आले होते. ही संधी साधून नागरिक व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, कचरा समस्या, कायदा सुव्यवस्था आदी समस्या बाबत निवेदन दिले.

अजित पवार यांनी या निवेदनाची दखल घेत भाषणात त्या समस्यांचा उल्लेख करून निवडणुकीनंतर माझ्याकडे या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिक, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, भाजपचे अनिल सातव, केतन जाधव, संदीप सातव, वाकोचे अनिल मिश्रा

आदींनी समस्यांचे निवेदन देवून गडकरी व पवार यांच्याशी संवाद साधला.  गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजी नगर हा नवीन मार्ग व 10 हजार कोटी रुपये खर्चून पुणे ते शिरूर मस्टीलेयर प्लाय ओव्हर मार्ग करणार असल्याची घोषणा केल्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मस्टीलेयर प्लाय ओव्हर मार्ग होणार की केवळ घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी अनेक वेळा मुलाखतीत, भाषणात पुणे ते शिरूर मस्टीलेयर प्लाय ओव्हर मार्ग करणार असल्याची घोषणा केली आहे. शनिवारी त्यांनी पुन्हा त्याची घोषणा केली. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचीही निवडणूक जाहीर होण्यापूर्वी चर्चा होती. त्यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया द्वारे गडकरी यांचे आभारही मानले. मात्र ही प्रक्रिया रद्द झाल्याचीही शनिवारी चर्चा होती. त्यामुळे हा मस्टीलेयर प्लाय ओव्हर मार्ग होणार की केवळ घोषणा आहे. अशी चर्चाही नागरिकांमध्ये रंगली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT