पुणे : कोरोनामुळे पुण्यासह देशभरात चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे रुग्णांच्या जीव धोक्यात टाकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
झाले असे, की नायडु हॉस्पिटलमध्ये काल(ता.3) रात्री अकरा वाजून 36 मिनिटांनी अचानक लाईट गेल्यामुळे महावितरण'चा वीज सप्लाय बंद पडला. वीज गेल्यानंतर जनरेटर सुरु होणे अपेक्षित होते मात्र, जनरेटर देखील नादुरुस्त असल्यामुळे काही काळ वीज पुरवठा पुर्णपणे बंद होता. दरम्यान, त्यामुळे व्हेंटीलेटरवरील रुग्णांचा जीव काही काळ धोक्यात आला होता.
दहा मिनिटांनी महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत झाला म्हणून व्हेंटीलेटरवरील रुग्णांचा जीव वाचले. व्हेंटीलेटरच्या बॅटरी देखील डिर्चार्ज होत आल्या होत्या. साधारण 20 ते 25 व्हेंटीलेटरवर होते. जर महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत झाला नसता तर अनर्थ घडला असता. नायडु हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने जनरेटच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष्य केल्याने मोठा अनर्थ घडला असता. लॉकडाऊनमुळे देखभाल दुरुस्ती करणारे उपलब्ध कोणीही उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे.
यापुर्वीही वीज पुरवठा खंडीत झाला आणि जनरेटर उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय झाल्याची घटना बीडमधील शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये घडल्याचे समोर आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.