Court sakal
पुणे

Pune Crime : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

‘तू माझ्यासोबत का नांदत नाहीस,’ असे म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन अर्चनाच्या चेहरा, डोके व मानेवर चाकू व कोयत्याने ३७ वार करून तिचा खून केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर कोयता आणि चाकूने वार करत खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी निकालपत्रात नमूद केले आहे.

भालचंद्र गिराप्पा सुर्वे (वय ३७, रा. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने पत्नी अर्चना सुर्वे(वय २८) यांचा ३७ वार करून निर्घृण खून केला होता. याबाबत अर्चना यांचे वडील दत्ता बाबूराव बागडे (वय ५४, रा. उरुळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २८ जुलै २०१९ रोजी सकाळी अकराच्या सुमारास उरुळी देवाची येथील अशोक नगरमध्ये घडली होती.

अर्चना आणि भालचंद्र यांचा २००८ ला विवाह झाला होता. त्यांना दोन मुलगे आहेत. सततच्या भांडणाला कंटाळून अर्चना या दोन्ही मुलांसह जानेवारी २०१८ मध्ये उरुळी देवाची येथे पालकांकडे राहायला आल्या होत्या. घटनेच्या दिवशी अर्चना या एकटीच घरी असताना भालचंद्र तिथे आला.

‘तू माझ्यासोबत का नांदत नाहीस,’ असे म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन भालचंद्रने अर्चनाच्या चेहरा, डोके व मानेवर चाकू व कोयत्याने ३७ वार करून तिचा खून केला आणि पोबारा केला. हा प्रकार कळताच तिचे पालक घरी आले असता अर्चना दरवाजातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, असे तक्रारीत नमूद आहे. सहायक निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी तपास करून आरोपी भालचंद्रविरोधात खुनासह शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांनुसार आरोपपत्र दाखल केले.

सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. गुन्हा शाबीत करण्यासाठी त्यांनी १२ साक्षीदार तपासले. आरोपी भालचंद्रला अर्चनाचा खून करताना पाहणारा तिचा भाऊ आणि शेजारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

आरोपीने वापरलेला चाकू व कोयता घटनास्थळी सापडला, तसेच त्याच्या कपड्यावर मृत महिलेचे रक्त सापडले. त्यामुळे आरोपीला कोणतीही दया न दाखविता कठोर शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील कावेडिया यांनी केला. निरीक्षक शशिकांत चव्हाण, हवालदार ललिता कानवडे आणि शिपाई माणिक गळाकाटे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : पर्थ कसोटी जिंकताच गौतम गंभीर तातडीने मायदेशात परतला, नेमकं असं काय घडलंय?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे 11 वाजता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

Instagram New Feature : इंस्टाग्राममध्ये 3 धमाकेदार फीचर्सची एंट्री! पटकन बघून घ्या नवं अपडेट

Shashi Ruia Passes Away: एस्सार समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचे निधन

म्हणून अर्जुन आणि मलायकाचा झाला ब्रेकअप ; 'हे' होतं कारण

SCROLL FOR NEXT