पुणे

पुणे : जागा भरणे आहे! घरपोच दारू पोहोचवण्यासाठी हवेत डिलिव्हरी बॉईज्

सकाळवृत्तसेवा

पुणे : घरपोच मद्यविक्रीला पुण्यात फारसा प्रतिसाद मिळेल, अशी चिन्हे नसल्याचे शुक्रवारी (ता.१५) दिसून आले. प्रशासनाने याबाबत प्रक्रिया सुरू केली तरी, मद्य घरापर्यंत पोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉईजची फारशी नोंदणी झालेली नाही. तसेच ग्राहकांची संख्या एकदम घटल्यामुळे दुकानदारही याबाबत बॅकफूटवर गेले आहेत.

राज्य सरकारने मद्याची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली आहे. राज्यात गुरुवारपासून याबाबत प्रारंभ झाला आहे. प्रत्येक दुकानदाराने 10 डिलिव्हरी बॉईज ठेवून त्यांची वैद्यकीय तपासणी करायची आहे. तसेच ग्राहकाला एमआरपीमध्ये मद्यविक्री करायची आहे, असे बंधन राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुकानदारांवर घातले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे म्हणाले, ग्राहकांसाठी काऊंटरवर मद्य खरेदी करणे, टोकनद्वारे मद्य खरेदी करणे, आणि होम डिलिव्हरी हे तिन्ही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याबाबतची प्रक्रिया उत्पादन शुल्क विभागाने सुरू केली आहे. विभगात डिलिव्हरी बॉईजची फारशी
नोंदणी झालेली नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुकानदार म्हणतात, डिलिव्हरी नको रे बाबा...

याबाबत पुणे डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंटस् असोसिएशनचे सचिव अजय देशमुख म्हणाले, 'ग्राहकांना माल घरपोच देण्याचा सरकारचा उद्देश चांगला आहे. परंतु, त्यात काही अडचणी आता निर्माण झाल्या आहेत. एक तर, मद्यखरेदीसाठीची गर्दी आता कमी झाली आहे. तसेच कोणतेही जादा शुल्क न घेता माल घरपोच कसा द्यायचा, त्यासाठी दहा डिलिव्हरी बॉईज नियुक्त करायचे, त्यांना गाड्या द्यायच्या, पेट्रोल,त्यांचा पगार हा सगळा प्रश्न आहेच.'

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशमुख पुढे म्हणाले, 'शहरातील 80 सोसायट्या सध्या डिलिव्हरी बॉईजला आवारात येऊ देत नाहीत. मग हे कसे शक्य होणार. मोबाईल नंबरवरून विक्री करताना गैरप्रकारही होऊ शकतात. तसेच 200-400 रुपयांसाठी डिलिव्हरी कशी देणार, आदी अनेक प्रश्न दुकानदारांपुढे आहेत. त्यामुळे घरपोच डिलिव्हरी, सध्या अवघड आहे. मात्र, काही भागात हे शक्य आहे.'

लायसन्सधारकांनाच दारू विक्री

ऑनलाईन पद्धतीने मद्य विक्री करताना ज्यांच्याकडे मद्य सेवन करायचा परवाना आहे, त्यांनाच विक्री करायची, असाही आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. हा परवाना नागरिकांना stateexcise.maharashtra.gov.in किंवा  
exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक वर्षासाठी 100 रुपये, तर आजीवन परवान्यासाठी 1 हजार रुपये शुल्क आहे. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्यावर एक दिवसात हा परवाना मिळेल, असेही सुर्वे यांनी सांगितले. गुरुवारी एका दिवसात शहरात सुमारे 350 जणांनी ऑनलाईन पद्धतीने परवाने घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT