जुन्नर - येथील न्यायालय परिसरात जुन्या वट वृक्षाची मोठी फांदी अचानक पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ता.२० रोजी दुपारी घडली. न्यायालयीन कामासाठी बहिणींसोबत आलेले पक्षकार चंद्रकांत किसन हांडे (वय ५४) रा.उंब्रज नंबर दोन ता.जुन्नर असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
यावेळी उपस्थित वकील व नागरिकांनी हांडे यांच्या अंगावरील झाडाची फांदी बाजूला केली. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप कोकाटे यांनी दिली.
मयत हांडे यांच्या मागे पत्नी,मुलगा व मुलगी असा परिवार आहे.जुन्नर पोलीसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ह्या झाडाच्या अनावश्यक फांद्या तोडण्यात याव्यात अशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे सांगण्यात आले.
धान्यबाजार येथे देखील काही दिवसांपूर्वी एका टपरीवर झाडाची फांदी पडून झालेल्या दुर्घटनेत एका मजूराचा पाय मोडला होता.
न्यायालयाच्या आवारातील ह्या घटनेने जुन्नर शहरातील जुन्या जीर्ण झाडांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे याबाबत प्रशासनाने भविष्यात जीवित हानी टाळण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा नागरिक करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.