bursting water tank sakal
पुणे

Nasrapur News : पाण्याची टाकी फुटुन चिमुरडीचा मृत्यु; तर एक मुलगी जखमी

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर - किकवी, ता. भोर येथे विटभट्टीवर बांधलेली पाण्याची टाकी फुटुन टाकीची भिंत अंगावर पडुन एक तीन वर्ष वयाच्या चिमुरडीचा मृत्यु झाला. तर एक 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास करण्यात येत आहे.

विद्या पांगु जाधव (वय वर्ष 3) या मुलीचा या घटनेत मृत्यु झाला. तर लक्ष्मी गोविंद वाघमारे (वय 13 वर्ष) हि मुलगी जखमी झाली आहे. दोघीही राहणार मुळ गाव कैलक्ल, ता. माणगाव, जि. रायगड सध्या रा. किकवी, ता. भोर (ता.12) रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास जमिन गट नं. 212 मधील विटभट्टीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकी मध्ये पाणी भरण्याचे काम चालु होते.

या दरम्यान टाकी फुटुन टाकीच्या सर्व भिंती पडल्या. यावेळी तेथे खेळणारी विद्या व लक्ष्मी या दोघी पडलेल्या टाकीच्या भिंती खाली सापडल्या. यामध्ये तीन वर्ष वयाच्या विद्याचा जागीच मृत्यु झाला तर लक्ष्मी जखमी झाली.

घटना झाल्याचे समजताच विटभट्टीवरील कामगार घटनास्थळी जमा झाले. तेथे राहणारे जागेचे मालक गणेश दत्तात्रय भिलारे यांनी तातडीने रुग्णवाहीका बोलावुन दोघींना रुग्णालयात पाठवले. परंतु लहान विद्याचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला होता. तर लक्ष्मीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याबाबत सदर जागेचे मालक गणेश दत्तात्रय भिलारे यांनी राजगड पोलिस ठाण्यात या घटनेची खबर दिली असुन, पोलिसांनी या अकस्मिक मृत्युची नोंद केली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार राजेद्र चव्हाण करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT