Sinhagad sakal
पुणे

पुणे : सिंहगडावर रस्ता चुकलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी शोधले

पर्यटकांनी नेहमीच्या पाय वाटेने न जाता. बर्ड व्हॅली मार्गे जाण्याचा प्रयत्न केला

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : सिंहगडावर पायी जाणाऱ्या त्या दोन पर्यटकांनी नेहमीच्या पाय वाटेने न जाता. बर्ड व्हॅली मार्गे जाण्याचा प्रयत्न केला असता. अंधारामुळे ते रस्ता चुकले. मदतीसाठी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला. आतकरवाडी येथील युवक कार्यकर्ते वनसंरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक अशा सुमारे ३०- ४० जणांनी शुक्रवारी रात्रीच्या थंडीत दऱ्याखोऱ्यात त्यांचा शोध घेतला. अखेर शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वाघदरीच्या परिसरात त्यांची त्यांचा शोध लागला. धनकवडी परिसरातील नितीन कचरे व निलेश कदम अशी रस्ता चुकलेल्या दोघांची नावे आहेत. (Nitin Kachare and Nilesh Kadam from Dhankawadi area are the names of the two who missed the road)

पासलकर यांनी सांगितले की, त्यांच्या मित्र परिवारातून त्यांना माझा नंबर मिळाला. मी ही माहिती वन संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय जोरकर यांना सांगितले. त्यांनी आतकरवाडीतील तरुणांना याची माहिती दिली. ते दोघे पुण्यातील आहेत. ३० ते ३५ वयोगटातील दोन युवक दुपारी साडेचार वाजता सिंहगड पायथा आतकरवाडी मार्गे गडावर जाण्यासाठी निघाले होते. गडावर जाताना त्यांनी नेहमीची पायवाटने न जाता. बर्ड व्हॅली मार्गे जाण्याचा प्रयत्न केला. ते सुरवातीला रस्ता चुकले अंधार पडल्याने गेलेल्या रस्त्याने परत येण्याऐवजी घाट रस्त्याच्या दिशेने निघाले. पुढे गेल्यावर रस्ता चुकले. त्यांनी रस्ता चुकल्याचे पाऊणे सात वाजता सांगितले. त्यानंतर शोध मोहीम सुरू झाली.

घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच दादा पढेर, पोपट भोंडेकर, तरूण ग्रामस्थ, माऊली कोडीतकर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन पासलकर समीर खिरीड, संदीप खिरीड यांनी तीन चार पथके तयार करून त्यांचा शोध घेतला. दादा पढेर व पोपट भोंडेकर यांनी आतकरवाडीतून बर्ड व्हॅलीमार्गे पुढे गेल्यावर वाघदरीच्या दिशेने गेल्यावर या दोन तरुणांचा शोध लागला. दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा शोध लागला. त्यांना घेऊन आतकरवाडीत रात्रीचे अकरा वाजता पोचले.(search for the two youths began after they passed through Bird Valley and headed towards Waghdari)

बर्डव्हॅली परिसरात वन विभाग व गुराखी यांच्या पायवाटा आहेत. परंतु त्यामार्गे गडावर जाण्यासाठीचा रस्ता नाही. खरच तसेच या ठिकाणी मोठा 25 ते 30 फुटांचा कातळ खडक आहे. तसेच तिथे धबधबा देखील आहे. या ठिकाणी गडाचा काही भाग थेट खडा असल्याने या मार्गे गडावर जाण्यासाठी रस्ता नाही. घनदाट झाडी आहे. गार हवं असल्याने ते गारठले होते. सर्व भाग अवघड परिसर आहे. गडावरील व घाट रस्त्यातील वाहनांचे दिशेने जात राहिले. त्यातच अंधार पडल्यामुळे वाघ दरीत गेल्यावर पुढे मार्ग सापडला नाही. अंधार झाल्याने परतीचा मार्ग देखील पडला नाही. त्यांनी त्यांचे मित्र सचिन पासलकर यांना मोबाईलवरून संपर्क साधला. त्यानंतर ग्रामस्थांनी तसेच वन संरक्षण समितीचे सुरक्षारक्षक असे सर्वांनी मिळून रस्ता चुकलेला या दोन पर्यटकांची आणि ग्रामस्थांची भेट झाली मी त्यांना साडेअकरा वाजेच्या सुमारास सुखरूप आतकरवाडी पोचले.(Bird Valley area has footpaths between the Forest Department)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT