पुणे - बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या विविध कंपन्यांच्या मालकीच्या मालमत्तेचा लिलाव होऊन आपले पैसे मिळतील अशी आस असणाऱ्या ठेवीदारांची लॉकडाऊन काळात निराशा झाली आहे. कोरोनाचा फैलाव झाल्यापासून गेल्या पाच महिन्यात लिलावाबाबत ठोस निर्णय न झाल्याने ठेवीदारांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश न्यायालयाने 20 जानेवारी रोजी दिला आहे. डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या 463 स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. नोटीस काढल्यानंतर संबंधित संपत्तीबाबत कुणाची हरकत असल्यास त्यांनी न्यायालयात हजर राहून आपल्या हरकती नोंदवाव्यात. त्या हरकतींचा निपटारा झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार त्याबाबत सुमारे 93 हरकती आल्या होत्या.
डीएसकेंकडे गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांनामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. आमच्या दैनंदिन गरजा भागणे देखील आता मुश्कील झाले आहे. त्यामुळे संपत्तीचा त्वरित लिलाव करून आम्हाला पैसे द्यावेत, अशी मागणी सातत्याने त्यांच्याकडून होत आहे.
आधी बँकांना मग ठेवीदारांना पैसे -
संपत्तीची विक्री केल्यानंतर त्यातून मिळालेले पैसे पहिल्यांदा डीएसके यांनी ज्या बँकांतून कर्ज घेतले त्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेले पैसे ठेवीदारांना देण्यात येतील. पुणे, वणी आणि लोणावळा यासह राज्यभरात डीएसके यांची संपत्ती आहे. त्यांचा विक्रीतून सुमारे दीड हजार कोटी रुपये जमा होऊ शकता, असा सरकार पक्षाचा अंदाज आहे.
कोरोना काळात इतर आजारांकडे दुर्लक्ष होतेयं? वाचा, काय म्हणतायेत तज्ज्ञ
वाहनांच्या लिलावातून 39 लाख 45 हजार रुपये जमा -
डीएसके यांच्या सहा वाहनांची फेब्रुवारी महिन्यात जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात आली आहे. यातून 39 लाख 45 हजार रुपये जमा झाले आहेत. तर डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेले 6 कोटी 65 लाख रुपये आणि वाहने विकल्यानंतर जमा झालेली रक्कम ठेवीदारांमध्ये कशा पद्धतीनेवाटता येईल, याचा आराखडा तयार करून न्यायालयात सादर करण्याचे आदेश यापूर्वी न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिला आहेत.
शिरीष कुलकर्णी आणि डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या असणाऱ्या संपत्ती लिलावातून वगळण्याची विनंती करण्यात आली आहे.14 संपत्तीबाबत आम्ही हरकत नोंदवली आहे. लिलावाबाबत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांचे पालन व्हावे, अशी विनंती न्यायालयास करण्यात आली आहे.
- ऍड. आशिष पाटणकर, बचाव पक्षाचे वकील
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.