Vikram Kumar Sakal
पुणे

Pune Road : लोहगाव विमानतळ ते राजभवन रस्त्याची दुर्दशा आली समोर

लोहगाव विमानतळ ते राजभवन या रस्ता कायमच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरला जातो. या रस्त्याचे सुशोभीकरण, दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

लोहगाव विमानतळ ते राजभवन या रस्ता कायमच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरला जातो. या रस्त्याचे सुशोभीकरण, दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.

पुणे - लोहगाव विमानतळ ते राजभवन या रस्ता कायमच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरला जातो. या रस्त्याचे सुशोभीकरण, दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ‘जी २०’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पाहणी केली असताना या रस्त्याची दुर्दशा समोर आली आहे.

ठिकठिकाणी पडलेले खड्डे, पादचारी मार्गावर वाढलेले गवत, अतिक्रमणे, अनधिकृत फ्लेक्स आणि घाण झालेले दुभाजक अशी अवस्था आहे. देश-परदेशातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी या रस्त्यावरून जाणार असल्याने २० डिसेंबरच्या आत हा रस्ता स्वच्छ करा, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पुणे महापालिकेने ही तयारी कागदावर केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र स्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. महापालिका आयुक्तांनी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील मेरिएट हॉटेलपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली, त्यावेळी पथ, विद्युत, प्रकल्प, अतिक्रमण, घनकचरा, पीएमआरडीए आणि क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते. १० किलोमीटरच्या अंतरावर प्रमुख चौकांची पाहणी आयुक्तांनी केली. महापालिका आयुक्तांनी व्हीआयपी रस्त्याच्या या दुरवस्थेवर अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करत त्वरित दुरुस्ती व सुशोभीकरणाचे आदेश दिले आहेत.

तयारीचा आढावा

‘जी २०’ या परिषदेचे २०२३ मध्ये अध्यक्षपद भारताकडे आहे. देशातील सुमारे ५६ शहरांमध्ये वर्षभरात बैठका होणार आहेत. त्यापैकी तीन बैठका १३ ते १५ जानेवारी, १६ ते १८ जून व २८ व २९ जून या कालावधीत होणार आहेत. त्यादृष्टीने महापालिकेच्या तयारीला वेग आलेला आहे. राज्य व केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला जात आहे.

तयारीबाबत...

- पुण्यात होणाऱ्या परिषदेसाठी देशातील तसेच परदेशातील सुमारे २५० उच्च पदस्थ उपस्थित राहणार

- हे अधिकारी शहरातील विविध पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार

- या काळात शहर स्वच्छ असावे यासाठी होर्डिंग, अनधिकृत फ्लेक्स, अतिक्रमण काढले जात आहेत

- रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत

- खासगी संस्था, कंपन्यांच्या मदतीने ६० चौकांचे सुशोभीकरण

पाहणीत काय आढळले?...

  • एअरपोर्ट जंक्शन येथे अस्वच्छता, खासगी जागेत पडलेला राडारोडा

  • रस्त्याच्या कडेने वाढलेले गवत आणि रस्त्यावर खड्डेही

  • विकफिल्ड चौक येथेही राडारोडा, रस्ता व पादचारी मार्गावर गवत

  • येरवडा कारागृहाच्या भिंतीच्या बाजूने कचरा टाकलेला

  • पादचारी मार्गावर अतिक्रमण, पादचारी मार्गाची दुरवस्था, खराब झालेला ‘पीएमपी’चा बसथांबा

  • गोल्फ चौक, गुंजन टॉकीज चौक, पर्णकुटी चौक, मंगलदास रस्ता, जहांगीर रुग्णालय रस्ता, आरटीओ, शिमला ऑफिस चौक, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्त्यावरही अनेक समस्या

विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची पाहणी केली आहे. अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स, रस्त्यात आलेल्या केबल काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. रस्तेदुरुस्ती, सुशोभीकरणाची कामे २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जी-२० परिषदेसाठी पुणे शहर लवकरच सज्ज होईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT