RTO esakal
पुणे

Baramati News : थकीत दंड निम्म्या सवलतीत भरण्यासाठी बारामतीत लोकअदालत

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ई-चलन मशीनद्वारे दंड झालेल्या वाहनांना 50 टक्के सवलतीत दंडाची रक्कम भरता येणार.

मिलिंद संगई

बारामती - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ई-चलन मशीनद्वारे दंड झालेल्या वाहनांना 50 टक्के सवलतीत दंडाची रक्कम भरता येणार आहे.

बारामती वाहतूक शाखा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने 8 ते 13 एप्रिल दरम्या सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत बारामती वाहतूक शाखा नवीन इमारतीत (बारामती हॉस्पिटलजवळ) ही लोकअदालत विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील वाहनांवरील ई-चलन दंडाची आकारलेल्या थकीत रकमेचा विचार करून, नागरिकांचा वेळ आणि रक्कम वाचवण्यासाठी ही सुविधा बारामती येथे उपलब्ध करण्यात येणार आहे. थकीत रकमेवर 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तब्बल सहा दिवसांसाठी 'हेल्प डेस्क' सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फतीने बारामती वाहतूक शाखेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ही सुविधा बारामती येथे सुरु करण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एस.एच. वानखडे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष प्रयत्न केले.

पुणे न्यायालयातील न्यायालयीन कर्मचारी सुधीर वानखडे, विक्रम पाठक, प्रकाश कुकडे, नितीन गायकवाड, विजय चव्हाण, बारामती वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अशोक झगडे, सुभाष काळे प्रशांत चव्हाण, रेश्मा काळे, सीमा साबळे, संगीता घुले, सविता काजळे, अजिंक्य कदम, सुधाकर जाधव, सविता धुमाळ, योगेश कांबळे, प्रदीप काळे, रुपाली जमदाडे, माया निगडे हे दंड भरून घेऊन कार्यवाही करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सुट्टीचे दिवस वगळता ही मोहीम सुरु राहणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस, पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुणे महामार्ग पोलीस यांनी केलेले खटल्याचे दंड भरून घेतले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT