Lok sabha election 2024 No Water No Vote Warning of residents to boycott voting khandave nagar pune Sakal
पुणे

Lok Sabha Poll : पाणी नाही, तर मतदान नाही; खांदवे नगर, पाणीटंचाईमुळे रहिवाशांच्या संतप्त भावना

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : नगर रस्त्याला लागून असलेल्या लोहगाव मधील खांदवेनगर परिसरात पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने दहा दिवसानंतर फक्त एक तासभर पाणी पुरवठा केला जाते. त्यामुळे आता ‘पाणी नाही तर मतदान नाही’ अशी स्पष्ट भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे.

नगर रस्त्यावर खराडीच्या जवळ खांदवे नगरचा परिसर आहे. येथील लोकसंख्या सुमारे पंधरा हजार इतकी आहे. पूर्वी हा भाग लोहगाव ग्रामपंचायत हद्दीत येत होता. मात्र पुणे महानगरपालिकेत या गावाचा समावेश झाल्यानंतर येथील पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आली. तेव्हापासून या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना या भागाकडे मात्र राजकीय पुढारी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता येथील नागरिकांनी आंदोलन केले, अर्ज केले, पाठपुरावा केला, मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली.

नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील नागरिकांना चढ्या दराने पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागतात. तसेच पिण्याकरता एक रुपये लिटर या दराने पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला महिन्याला साधारणता तीन हजार रुपये पाण्यासाठी मोजावे लागतात.

येथील नागरिक पुणे महानगरपालिकेला लाखो रुपये कर भरतात. त्यामध्ये पाणीपट्टीही घेतली जाते. मात्र तरीही आम्हाला पाणी विकत घ्यावे लागते, अशी संतप्त भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.

या भागातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनाही पत्र पाठवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरता लक्ष घालण्याची मागणी केली. मात्र तरीही येथील नागरिकांच्या पदरी निराशा आली.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने या भागासाठी टँकर ने पाणीपुरवठा केला जात असल्याचे अधिकारी सांगतात. तसेच खांदे नगर येथील पाण्याच्या टाकीत टँकर आणून ओतले जातात आणि त्यानंतर ते पाणी टाकीत चढवून एका गल्लीला एक दिवस याप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे आठ ते दहा दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. मात्र त्यामध्ये तांत्रिक अडचण आल्यास कधी कधी दहा ते बारा दिवस पाण्यासाठी थांबावे लागते.

टाटा गार्डरुम येथील पाण्याची टाकी वरच्या पातळीपर्यंत भरली जात नसल्यामुळे खांदवे नगर पर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या भागाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

- सुधीर आलूरकर (कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा विभाग)

लोहगाव ग्रामपंचायत मधून पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यापासून आम्हाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तक्रार केल्यानंतर ‘पाहू, करू, येतो अशी उडवा उडवीची उत्तरे आम्हाला मिळतात. मागील सहा महिन्यांपासून दर दहा दिवसांनी चाळीस मिनिटे पाणी मिळते.

-मीना साळवी (रहिवासी)

आम्ही पुणे महानगरपालिकेला कर भरतो. परंतु पाण्यासारखी मूलभूत गरजही पुणे महानगरपालिका पूर्ण करीत नाही. आम्हाला दिवसाआड किंवा दोन दिवसांनी पाणीपुरवठा व्हावा अशी आमची मागणी आहे. आमच्या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही मतदान करणार नाही.

- शिवाजी देसाई (रहिवासी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT