lokadalat sakal
पुणे

लोकअदालत मुळे मागणीपेक्षाही जास्त मिळाली भरपाई

पोलिसाच्या कुटुंबीयांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिस कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीय मागितलेल्या नुकसान भरपाईपेक्षा जास्त रक्कम देण्याचे आदेश लोक अदालतीने संबंधित विमा कंपनीला दिले आहेत. या कर्मचाऱ्याची भविष्यात होणारी पगार वाढ लक्षात घेऊन ही रक्कम देण्यात आली आहे. (lokadalat order insurance company compensation police family)

कुटुंबीयांनी मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दाखल केलेल्या दाव्यात ५० लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र, लोकअदालतीमध्ये तडजोडीअंती ५८ लाख रुपये भरपाई देत हा दावा निकाली काढण्यात आला. एका वर्षाच्या व्याजची रक्कमही पोलिस कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश प्रदीप अष्टुरकर, ॲड. अतुल गुंजाळ आणि सुभाष किवडे यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला. संबंधित पोलिस कर्मचारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना दरमहा २२ हजार रुपये पगार होता. ते ८ एप्रिल रोजी २०१७ रोजी कात्रज बायपास येथून दुचाकीवरून जात होते.

त्यावेळी टेम्पोची धडक असल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांची पत्नी, दोन मुले आणि आईने ॲड. कांचन धामणकर यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दावा दाखल केला होता. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनी आणि टेम्पो मालकाच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. पोलिसाच्या कुटुंबीयांच्यावतीने ॲड. धामणकर यांनी काम पाहिले. तर कंपनीच्यावतीने ॲड. ऋषिकेश गानू यांनी बाजू मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi-Trump: विजयानंतर ट्रम्प यांना पहिला फोन मोदींचा; म्हणाले, माझ्या मित्रासोबत...

Elon Musk on Trump Victory: ट्रम्प यांच्या विजयावर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अपरिहार्य...

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT