Murlidhar Mohol sakal
पुणे

Murlidhar Mohol : स्टार्टअपला चालना देणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले मंडई, गाडीखाना, खडकमाळ आळी, कस्तुरे चौक,  कृष्णाहट्टी चौक, लोहियानगर, मीठगंज पोलिस चौकी परिसरात प्रचारफेरीचे आयोजन केले होते. यामध्ये आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, दीपक मिसाळ, स्वरदा बापट, अजय खेडेकर, विष्णू हरिहर, आरती कोंढरे, सम्राट थोरात, योगेश समेळ, राजेश येनपुरे उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘आयटी हबला बूस्टर मिळावा यासाठी धोरण आखणार आहे. आयटी हबमुळे बांधकाम क्षेत्रापासून लॉन्ड्री, मेसपर्यंत छोट्या-मोठ्या व्यवसायांतून रोजगार निर्मिती होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. राज्याच्या दरडोई उत्पन्नात १८ टक्के वाटा पुणे शहराचा आहे.

उद्योग, सेवा आणि व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच निर्यातवाढीसाठी जिल्ह्याचा आराखडा तयार करणार आहे.’

संशोधनाला चालना देणार

एनसीएल, एनआयव्ही, एसीसीएस, एनसीआरए, आयुका, आयसर, सी-डॅक, सी-मेट, आयआयटीएम, सीडब्ल्यूपीआर अशा दोन डझनपेक्षा जास्त संशोधन संस्था शहरात आहेत. विकसित पुण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून संशोधनाला चालना देणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT