supriya sule srirang barne murlidhar mohol amol kolhe sakal
पुणे

Loksabha Election 2024 Result : पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडीला समान जागा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी तब्बल एक लाख ५३ हजार मतांनी, तर शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांनी एक लाख ४१ हजार मतांनी दणदणीत विजय मिळविला.

मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी ९६ हजार ६१५ मतांनी विजय मिळवून हॅट्‌ट्रिक केली, तर पुण्यातून भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ एक लाख २२ हजार मतांनी विजयी झाले. जिल्ह्यात दोन जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दमदार कामगिरी केली.

सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांना या निवडणुकीत उभे केले होते. नणंद-भावजय या निवडणुकीत समोरासमोर होत्या. अजित पवार यांनी सुनेत्रा यांच्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. भावनिक मुद्द्यांवर झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी शरद पवार यांच्यावर विश्वास कायम ठेवला.

शिरूरमध्ये डॉ. कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेकडून तीन वेळा खासदार झालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान होते. आढळराव पाटील यांनी यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांच्यासाठी जोर लावला होता. परंतु, मतदारांना डॉ. कोल्हे यांची ‘संभाजी महाराजांची’ प्रतिमा भावली.

मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत झाली. दोन वेळच्या खासदारकीच्या अनुभवाच्या जोरावर बारणे यांनी सहज विजय मिळविला. पुणे शहरात मोहोळ यांच्यासमोर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी आव्हान निर्माण केले होते. धंगेकर यांनी सुरवातीच्या तीन-चार फेऱ्यांत आघाडी मिळविली होती. तेव्हा भाजपच्या गोटात काही वेळ चिंता निर्माण झाली होती.

परंतु, त्यानंतरच्या सलग फेऱ्यांत आघाडी घेत मोहोळ यांनी सहज विजय साध्य केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ४० आमदारांसह बाहेर पडून अजित पवार हे भाजपबरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर पहिल्यांदाच थेट सामना झाला.

त्यांच्यासोबत भाजप आणि शिवसेना होती. त्यामुळे बारामती, शिरूर मतदारसंघातील निवडणुकीबाबत कुतूहल निर्माण झाले होते. परंतु, शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारामुळे या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार सुमारे दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT