Voting sakal
पुणे

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे - परदेशात असले तरी सणासुदीला आवर्जून गावाकडे येणाऱ्या भारतीयांनी यंदा लोकशाहीच्या उत्सवातही तेवढाच सहभाग दर्शविला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील परदेशस्थ भारतीय मतदानासाठी दाखल झाले असून, यात पुणेकर नेहमीप्रमाणे आघाडीवर आहे.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात मतदानाची मूलभूत प्रक्रिया पार पडत आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवत परदेशात शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने असलेल्या नागरिकांनी मतदारसंघ गाठले आहेत. मावळ लोकसभेतील मतदार असलेले अनिकेत पवार गेल्या सहा वर्षांपासून परदेशात आहेत. खास मतदानासाठी ते गावी आले आहेत.

ते म्हणतात, ‘परदेशात जरी असलो तरी मतदान हा माझा हक्क आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. त्याच जाणिवेतून मी आलो आहे. लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीलाही आलो होतो.’

सध्या जपानमध्ये असलेले अक्षय तोतावार म्हणतात, ‘माझा हिंगोलीतील मतदारसंघ असून, निवडणूक घोषित झाल्यावर लगेचच मी येण्याचे नियोजन केले होते.’ अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया प्रांतात पोस्ट डॉक्टरल संशोधन करणारे डॉ. अनीश क्षिरसागरही मतदानासाठी रविवारी (ता. १२) पुण्यात येत आहेत. यांच्यासारख्या अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी स्वदेश गाठला आहे.

परदेशातून मायदेशी येण्यासाठी सुट्ट्यांचे नियोजन करताना आपण गणपती, दिवाळीच्या तारखा नेहमी बघतो. पण मग पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवाची तारीख बघून सुट्ट्यांचे नियोजन करायला काय हरकत आहे. १३ तारखेला मतदानाचा हक्क बजावता येईल, हे ठरवूनच मी या वेळेस सुट्टीचे नियोजन केले आहे. सकाळी ७ वाजता मतदान करून मतदान केंद्रावरूनच विमानतळाकडे रवाना होण्याचा मानस आहे.

- प्राजस शिवरकर, कझाकस्तान (मूळ- नारायण पेठ)

पुणे लोकसभा मतदारसंघात माझे मतदान आहे. सध्या मी अमेरिकेतील एका कंपनीत सीईओ असून, कोथरूडचा मुळ रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वी मतदानाची तारीख जाहीर झाल्यावर लगेचच मी तयारी केली. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील मतदार असल्याने, मतदानाचा हक्क बजावणे माझे कर्तव्य आहे.

- अजित जोशी, फ्रॅंकफर्ट, अमेरिका (मूळ- कोथरूड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT