Walkathon sakal
पुणे

London Saree Walkathon : ‘लंडनच्या रस्त्यावर भारतीय महिलांचा साडी वॉकेथॉन’

लंडनमध्ये ‘नॅशनल हॅन्डलूम डे’ निमित्त झालेल्या साडी वॉकेथॉनमध्ये २८ राज्यांमधील सुमारे ६०० भारतीय महिला सहभागी झाल्या.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - लंडनमध्ये ‘नॅशनल हॅन्डलूम डे’ निमित्त झालेल्या साडी वॉकेथॉनमध्ये २८ राज्यांमधील सुमारे ६०० भारतीय महिला नुकत्याच सहभागी झाल्या. लंडनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम झाला.

स्वदेशी चळवळ बंगालमधील कोलकत्ता टाऊनहॉल येथे ७ ऑगस्ट १९०५ रोजी सुरू झाली. तेव्हापासून ७ ऑगस्ट हा दिवस ‘नॅशनल हॅन्डलूम डे’ म्हणून साजरा होतो. या निमित्ताने लंडनमध्ये ६ ऑगस्ट रोजी साडी वॉकेथॉनच्या कार्यक्रमाचे आयोजन ‘ब्रिटिश वूमन इन सारी’च्या डॉ. दीप्ती जैन यांच्या नेतृत्वाखाली झाले.

लंडनमध्ये प्रथमच होत असलेल्या या वॉकेथॉनमध्ये सुमारे ६०० भारतीय महिलांचा सहभागहोता. सातासमुद्रापार वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये भारतीय हातमाग व हस्तकौशल्यातून तयार झालेल्या दागिन्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने हा कार्यक्रम झाला.

विविध राज्यांमधील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून लंडन येथील ऐतिहासिक ट्रॅफल्गार स्क्वेअर येथे जमल्या. तेथे दुपारी एक वाजता ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषात या वॉकेथॉनचा प्रारंभ झाला. हा वॉकेथॉन ट्रॅफल्गार स्क्वेअरपासून ब्रिटनच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेल्या १० डाउनिंग स्ट्रीट येथे पोचला.

त्या ठिकाणी सहभागी महिलांनी भारतातील विविधतेतून एकात्मतेचे प्रदर्शन करत ‘काश्मीर तू, मैं कन्याकुमारी’, दक्षिणेमधील राज्यांनी ऑस्कर पुरस्कृत ‘नाटु नाटु’ व ‘टम टम’, उत्तरेकडील राज्यांनी ‘भूमरो भूमरो’, पश्चिमेकडील राज्यांनी ‘घुमर’ तसेच पूर्वेकडील राज्यांनी ‘फागूणेर मोहानी’ अशा विविध गाण्यांवर नृत्य सादर केले.

त्यानंतर वॉकेथॉनमधील महिलांनी लंडनच्या वेस्टमिन्स्टरमधील ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वेअरवर महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रगीत सादर करून त्यांना मानवंदना दिली. या प्रसंगी ब्रिटनमधील ‘इंडियन हाय कमिशन’मधील काही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

पुण्यातील अनुजा हुडके जाधव, सोनिया गोखले व मुंबईतील रमा कर्मोकर, किरण चितळे यांनी या वॉकेथॉनमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातील ५० महिलांनी या वॉकेथॉनमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमामधून जमा झालेला निधी भारतातील विणकरांसाठी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT