Long queues of vehicles on the first day at Khed-Shivapur toll naka FastTag 
पुणे

Fastag Update: फास्टॅगचा पहिला दिवस; खेड-शिवापूर टोल नाक्यावर काय परिस्थिती?

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी खेड-शिवापूर टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना विना टोल सोडण्यात येत होते. त्यामुळे खेड शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. इतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून मात्र दुप्पट टोल आकारणी करण्यात येत होती.

हेही वाचा - शंभरीच्या दिशेने पेट्रोलची घोडदौड सुरुच; सलग 8व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सर्व टोल नाक्यांवर 16 फेब्रुवारीपासून शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुलीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरही ही शंभर टक्के फास्टॅगद्वारे टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यावर पूर्वी स्थानिक नागरीकांना टोल फ्री सोडण्यात येत होते. त्यामुळे शंभर टक्के फास्टॅग टोलवसुली सुरू झाल्यावर स्थानिक नागरीकांना टोल फ्री सोडण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. तर आम्ही टोल भरणार नाही, असा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला होता. तसेच खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीनेही स्थानिकांकडून टोल घेतल्यास आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मात्र पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया यांनी स्थानिक नागरिकांना तूर्तास तरी पाहिल्याप्रमाणे विना टोल सोडण्यात येईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मंगळवारी खेड-शिवापूर टोल नाक्यावर स्थानिक नागरीकांना विना टोल सोडण्यात येत होते. तर इतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारणी करण्यात येत होती. फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू असल्याने फास्टॅगधारक वाहनांनाही सुरळीत टोल पास करता येत होता.

हेही वाचा - शंभरीच्या दिशेने पेट्रोलची घोडदौड सुरुच; सलग 8व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ

खेड-शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी रोख स्वरूपात टोल देणाऱ्या वाहनांसाठी दोन मार्गिका ठेवण्यात आल्या होत्या. तर फास्टॅग वाहनांसाठी आठ मार्गिका ठेवण्यात आल्या होत्या. रोख टोल मार्गिकेत स्थानिक आणि रोख स्वरूपात टोल देणारी वाहने असल्याने या मार्गिकेत गर्दी होत  होती.

स्थानिकांसाठी दोन मार्गिका ठेवण्याची कृती समितीची मागणी
अनेक स्थानिक नागरीकांच्या वाहनांना फास्टॅग बसविलेले आहेत. अशा स्थानिक वाहनांचा खेड-शिवापूर टोल नाक्यावरून जाताना फास्टॅगमधून टोलचे पैसे वजा होतात. त्यामुळे त्यांना स्थानिकांसाठी टोल फ्रीचा फायदा मिळत नाही. त्यामुळे स्थानिक नागरीकांसाठी फास्टॅग स्कॅनर नसलेल्या दोन स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात याव्यात, अशी मागणी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे दिलीप बाठे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT