love triangle murder case 5 accused sentenced life imprisonment case solved after twelve years Sakal
पुणे

Pune Crime : प्रेमाच्या त्रिकोणातून खून; पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

खून झालेला तरुण पोलिसाचा मुलगा, बारा वर्षांनंतर खटला निकाली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाचा खून करणाऱ्या पाच जणांना न्यायालयाने जन्मठेप आणि एक लाख ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला. खून झालेला तरुण हा पोलिसाचा मुलगा होता. तब्बल बारा वर्षानंतर पोलिसाच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला.

प्रवीण दत्तात्रेय चौगुले (वय २५), यशवंत रामचंद्र खामकर (वय २४), अनिल बहिरू अजगेकर (वय २१), गोट्या ऊर्फ देवेंद्र अशोक माने (वय २०) आणि रमेश रंगल्या देवदुर्ग (वय २०, सर्व रा. कोल्हापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

त्यांनी प्रतीक प्रमोद जगताप (वय १९, रा. धानोरी) याचा २६ सप्टेंबर २०११ मध्ये शिक्रापूर कॅनल रस्ता परिसरात खून केला होता. प्रतीक यांचे वडील राज्य गुप्त वार्ता विभाग कार्यरत होते. आरोपींवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याचे कामकाज सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी पाहिले. प्रेमाच्या त्रिकोणातून हा खून झाला आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत न्यायालयानेही निकालात प्रेमाच्या त्रिकोण या शब्दाचा उल्लेख केला आहे.

दंडाच्या रकमेतून एक लाख ५० हजार रुपये रक्कम प्रतीकच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. गुन्हा शाबीत करण्यासाठी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) आणि टीडीआर ( टोल डिटेल रेकॉर्ड) महत्त्वपूर्ण पुरावे ठरले.

घटनेच्या दिवशी प्रवीनने प्रतीकला विमानतळ पार्किंग गेट येथे भेटायला बोलावले होते. तेथून त्याचे अपहरण करून कारमध्ये त्याचा गळा आवळून खून केला. प्रतीकची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह आरोपींनी जवळ असलेल्या झाडीत नेवून पेटवून दिला होता.

यामुळे झाला खून

रूपाली (नाव बदललेले) हिचे प्रतीकबरोबर प्रेमसंबंध होते. याबाबत प्रतीकच्या घरी समजल्यानंतर त्याच्या आर्इने रूपाली हिच्या घरी जाऊन आपल्या मुलाचा नाद सोडण्यास सांगितले होते. त्यामुळे घरचे लग्न लावतील म्हणून रूपाली प्रतीक बरोबर पळून गेली. ते दोघे एका बीपीओमध्ये पार्टटाईम नोकरी करू लागले.

तेथे रूपालीची प्रवीणशी ओळख झाली. त्यानंतर रूपाली प्रवीणबरोबर एकत्र राहू लागली. त्यामुळे प्रवीणने तिला लग्नासाठी विचारणा केली. पण तिने प्रतीकबरोबर प्रेमसंबंध असल्याचे प्रवीणला सांगितले. त्यामुळे प्रवीणने मित्रांच्या मदतीने प्रतीकचा काटा काढण्याचा कट रचला होता.

असा लागला गुन्ह्याचा छडा

खून करण्यासाठी पाचही आरोपी इचलकरंजीवरून पुण्यात आले होते. तपासादरम्यान पाचही आरोपींचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन हे शिक्रापूरपर्यंत दिसले. इचलकरंजी ते पुणे आणि पुणे ते इचलकरंजी मार्गावरील टोलनाक्यांवर आरोपींच्या गाडी दिसून आली. यातून त्यांचा कट उघडकीस आला. प्रतीकच्या मोबाईलवरून मेसेज पाठविल्याचे लोकेशन आणि मुख्य आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन एकच दिसून आले. यातून गुन्ह्याचा छडा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT