मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पोलिसांची माफिया सेना केली असून महाराष्ट्रातील माफिया सेनाराज संपवण्यासाठी किरीट सोमय्या मैदानात उतरला आहे.
नारायणगाव - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पोलिसांची (Police) माफिया (Mafia) सेना केली असून महाराष्ट्रातील माफिया सेनाराज संपवण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) मैदानात उतरला आहे. घोटाळेबाज यांना हिशोब द्यावाच लागेल. असा इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
खानापूर(ता.जुन्नर) येथे आज एका कार्यक्रमा निमित्त जात असताना वारूळवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार सोमय्या यांनी नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे , पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, सदानंद कदम,यशवंत जाधव , बजरंग खरमाटे, राहुल कनाल यांच्यावर कोट्यवधी रुपयांची बेनामी मालमत्ता जमा केल्याचे आरोप केले. या वेळी वारूळवाडी ग्रामपंचायतिच्या वतीने सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या हस्ते माजी खासदार सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके,भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, संतोष खैरे,उपसरपंच माया डोंगरे,जंगल कोल्हे,विनायक फुलसुंदर,ज्योती संते,राजश्री काळे, स्नेहल कांकरिया, रेखा फुलसुंदर आदी उपस्थित होते.
माजी खासदार सोमय्या म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संबंधित असलेले मुंबई महापालिकेतील यशवंत जाधव, विमल आगरवाल यांच्याकडे एका हजार कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता असल्याची कागदपत्रे मिळाली असून त्यांच्यावर आयकर विभागाचे धाडसत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मंत्री परब यांचे हिशोब ठेवण्याचे काम करणारे बजरंग खरमाटे, सदानंद कदम सल्लागार राहुल कनाल यांची आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे.घोटाळेबाजांनी शेकडो कोटि रुपयांची मालमत्ता जमा केली असून बेनामी मालमत्तेचा हिशोब घेतल्याशिवाय किरीट सोमय्या गप्पा बसणार नाही.असा इशारा या वेळी सोमय्या यांनी दिला. भारतीय जनता पक्ष व शिवसेना सत्तेत एकत्र असताना आपण आरोप केले नसल्याचा प्रश्न या वेळी पत्रकारांनी उपस्थित केला असता लुटमार व माफिया राज आता सुरू झाले असल्याचे सांगून या प्रश्नाला सोमय्या यांनी बगल दिली.सोमय्या पुढे म्हणाले पुणे येथे माझ्यावर हल्ला करण्यासाठी मुंबई येथून शंभर गुंड पाठवले होते. मात्र फक्त तेरा जणांवर कारवाई करण्यात आली.हल्ला केला की काय किंमत द्यावी लागते हे उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना आता कळाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.