श्री क्षेञ भीमाशंकर sakal
पुणे

श्रावणी सोमवारनिमित्त श्री क्षेञ भीमाशंकरला फुलांची आकर्षक सजावट

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : चौथ्या श्रावणी सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर (bhimashankar) मंदिरात पहाटे ५ वाजता शिवलिंगाची विधिवत पूजा देवस्थान ट्रस्टच्या वतीने पार पडली. गाभाऱ्यात विविधरंगी फुलांनी सजावट करण्यात आली असून पूजा व महाआरती झाल्यानंतर मंदिर कोरोनाच्या (corona) साथरोग महामारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

भीमाशंकर (bhimashankar) येथे भाविक व पर्यटक येऊ नयेत यासाठी तीन ठिकाणी पोलिस चेकपोस्ट उभारण्यात आली असून, भाविकांनी याठिकाणी येऊ नये. भगवान श्री. शंकराची घरातच पूजा, आराधना करून मंदिर व पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षांपासून मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या ठिकाणी भाविक येत नसल्याने येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून प्रशासनाने नियमांचे पालन करून मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.

श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे चौथा श्रावणी सोमवार निमित्ताने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भीमाशंकर, पालखेवाडी व डिंभे येथे पोलिस चेकपोस्ट उभारण्यात आली असून ३ ऑफिसर्स व ३५ पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. तरी भाविकांनी व पर्यटकांनी भीमाशंकर परिसरात प्रवेश करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan International Airlines: सुधरा रे ! पाकिस्तानी विमान पेशावरऐवजी उतरले कराचीत, प्रवाशांनी घातला गोंधळ

ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाने वन-डे मधील पाकिस्तानच्या विक्रमाची लावली वाट; इंग्लंडविरुद्ध दिसला थाट

Supreme Court Youtube : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'असले' व्हिडिओ होत आहेत शेअर

Bhutan: हॅप्पी कंट्रीमध्ये बिटकॉइनची हवा! भूतान बनला बिटकॉइनचा साठा असलेला जगातील चौथा सर्वात मोठा देश

..तरच गोवा-तमनार प्रकल्पाला मंजुरी देणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

SCROLL FOR NEXT