Gram Panchayat Election sakal
पुणे

Gram Panchayat Election : कांदळी ग्रामपंचायतची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

१३ ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा कांदळी ग्रामपंचायतची मुदत संपली

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : कांदळी (ता. जुन्नर )ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडतीची विशेष ग्रामसभा सोमवारी (दि. १९) रोजी दुपारी तीन वाजता कांदळी ग्रामपंचायतमध्ये पार पडली.

१३ ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा कांदळी ग्रामपंचायतची मुदत संपली असून या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे .औद्योगिक वसाहत ,पुणे -नाशिक महामार्गावरील महत्त्वाचे गाव म्हणून कांदळीची ओळख आहे.

तालुक्यातील २६ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमासाठी वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कांदळी ग्रामपंचायत मधील प्रभागातील सदस्य संख्या व आरक्षण जाहीर करण्यात आले असुन मंडलाधिकारी डी.बी. काळे ,कांदळीचे तलाठी संतोष जोशी, ग्रामविकास अधिकारी रंजना रघतवान यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे संचालक नबाजी घाडगे, माजी उपसरपंच अनिल भोर, संग्राम फुलवडे, नगदवाडी सोसायटीचे चेअरमन सुरेश बढे, कांदळी सोसायटीचे चेअरमन नवनाथ गुंजाळ, ग्रामपंचायतचे माजी सदस्य मनोज फुलसुंदर, विशाल रेपाळे ,सचिन रोकडे, गणपत गुंजाळ ,सोमनाथ रेपाळे हरी भोर ,संकेत बढे,

वसंत फुलवडे, पांडू नाना गुंजाळ, अशोक जगताप ,अरुण भालेराव ,रघुनाथ बढे, आजाबा भोर ,अजित घाडगे, संभाजी घाडगे ,बबन बढे, जालिंदर घाडगे ,गंगाराम भोर, रवींद्र बढे,सतीश कुतळ, अजित घाडगे ,संभाजी घाडगे उत्तम घाडगे ,उत्तम गुंजाळ, अनिल शिंदे, संजय बढे, अनिल घोडेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

२०११ च्या जनगणनेनुसार कांदळी ग्रामपंचायतीत १३ सदस्य असून इतर मागास प्रवर्गाच्या यापूर्वी चार जागा राखीव होत्या परंतु इतर मागास प्रवर्गाची लोकसंख्याअभावी एक जागा कमी झाली असून इतर मागास प्रवर्गाच्या तीन जागा आहेत.

एकूण १३ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ६ पुरुष व ७ महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आले आहे. इतर मागास प्रवर्गासाठी तीन जागा असून दोन पुरुषांसाठी तर एक महिलांसाठी राखीव आहे. एक जागा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे .

कांदळी ग्रामपंचायतचे गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे वार्ड नंबर१ - एकूण ३ जागा यामध्ये सर्वसाधारण पुरुष दोन, सर्वसाधारण महिला ,वार्ड क्रमांक २-एकूण ३ जागा यामध्ये सर्वसाधारण पुरुष , इतर मागासवर्ग पुरुष ,सर्वसाधारण महिला ,

वार्ड क्रमांक ३- दोन जागा सर्वसाधारण महिला , इतर मागास प्रवर्ग महिला ,वार्ड क्रमांक ४- दोन जागा इतर मागास प्रवर्ग पुरुष , सर्वसाधारण महिला ,वार्ड क्रमांक ५ - ३ जागा सर्वसाधारण पुरुष , सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT