Baramati Latest Update: शहरातील तीन हत्ती चौकात गेले 4 वर्षांपासून सुशोभीकरणाच्या नावाखाली चौकाचे वाटोळे करण्याचे काम सुरू आहे. पूर्वी मोठा असणारा चौक व रुंद असणारे रस्ते छोटे करून फक्त सुशोभीकरण करून विकासाचा दिखावा केला जात असल्याचे नमूद करत महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (ता. 8) आंदोलन केले गेले.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड सुधीर पाटसकर म्हणाले, गेल्या काही दिवसात हा रस्ता कमालीचा अरुंद झाला आहे, सतत वाहतूक कोंडी, अपघात अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बारामतीतील प्रशासन आणि नेतृत्व मनमानी कारभार करत आहेत.
यासर्व गोष्टींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बारामतीतील तीन हत्ती चौकात आंदोलन करण्यात आले. चौकाची सद्यस्थिती पाहता चौकाचे नामकरण "भुलभुलैया चौक" करण्यात यावे अशी देखील मनसेची मागणी आहे.
अँड. सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष निलेश वाबळे, शहराध्यक्ष स्वप्निल मोरे, प्रविण धनराळे, चंद्रकांत पवार, प्रशांत लोणकर, ओम पडकर, सागर जाधव, मयूर कुंभार, भार्गव पाटसकर, ओंकार राऊत, सुयश घाडगे, ओंकार सोनवणे, संकेत बेलसरे, सोमनाथ पाटोळे, धिरज पवार, विजय दळवी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.