Shrikant Bapat Sakal
पुणे

महाराष्ट्रीय मंडळ हे संस्कारांचे विद्यापीठ; श्रीकांत बापट

शिक्षण देणारी अनेक विद्यापीठे असतील पण, शिक्षण आणि बरोबरीने संस्कार करणारे महाराष्ट्रीय मंडळ हे एकमेव विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन निवृत्त आयपीएस अधिकारी श्रीकांत बापट यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिक्षण (Education) देणारी अनेक विद्यापीठे (University) असतील पण, शिक्षण आणि बरोबरीने संस्कार करणारे महाराष्ट्रीय मंडळ (Maharashtrian Mandal) हे एकमेव विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन निवृत्त आयपीएस अधिकारी श्रीकांत बापट (Shrikant Bapat) यांनी केले.

महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने देण्यात येणारा कै. कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृती क्रीडा पुरस्कार या वेळी बापट यांच्या हस्ते माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलो खेळाडू आणि प्रशिक्षक संजय करंदीकर यांना प्रदान करण्यात आला. या मुख्य पुरस्काराबरोबरच कै. लेफ्टनंट जनरल य. द. सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘उत्कृष्ट क्रीडा पत्रकार’ पुरस्कार ‘महाराष्ट्र टाईम्स’चे क्रीडा पत्रकार गोपाळ गुरव यांना देण्यात आला. हा कार्यक्रम गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये पार पडला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले हे उपस्थित होते.

बापट म्हणाले, दामले कुटुंबीयांची समर्पित सेवा म्हणजे हे महाराष्ट्रीय मंडळ. या मंडळाने आजपर्यंत अनेक खेळाडूच नाही तर सेनादलातील जवानही घडवले. शिवरामपंत दामले यांनी सुरू केलेले कार्य त्यांच्या पुढच्या पिढीने नुसतेच पुढे नेले नाहीतर वाढवले. म्हणूनच महाराष्ट्रीय मंडळ ही नुसती संस्था नसून संस्कार देणारे व्यासपीठ म्हटले तर चूक ठरणार नाही.

सत्काराला उत्तर देताना संजय करंदीकर म्‍हणाले, आम्ही पुलाच्या अलीकडे राहतो, वाढलो आणि खेळलो देखील. पण पुलाच्या पलीकडे इतकी मोठी क्रीडा संस्था आहे हे समजलेच नाही. मंडळाने खेळाचा वसा कायमच जपला. त्यांच्या कार्याची फिल्म पाहिल्यावर आजही प्रेरित झालो. त्यांनी माझा नाही तर माझ्या खेळाचा सन्मान केला आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी खेळत रहा आणि जास्तीत जास्त सांघिक खेळ खेळा. त्यामुळे आपल्याला एकत्र राहण्याची सवय लागते असा सल्लाही त्यांनी दिला. सशक्त पिढीची परंपरा जपणाऱ्या मंडळाने खेळ आणि खेळाडूचा सन्मान करण्याचा आदर्श घालून दिला. ही परंपरा अशीच पुढे चालू राहो, हीच अपेक्षा असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले. यावेळी भूषण गोखले यांनीही मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT