mahatma gandhi bus stop condition sakal
पुणे

Pune News : शहरातील महात्मा गांधी बसस्थानकाची दुरावस्था कधी सुधारेल? - प्रवाशांचा सवाल

मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट - पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रहदारीचा प्रश्न निर्माण झाला. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने यामुळे सर्वसामान्य जनतेला बससेवेशिवाय पर्याय नाही. तसेच अनेक ठिकाणी बसस्थानक असून नसल्यासारखे आहेत. अशीच अवस्था महात्मा गांधी पुलगेट बसस्थानकावर झाली आहे. या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात शहरातील कानाकोपऱ्यात बसेस जातात. सदर ठिकाणी जंक्शन असल्यामुळे प्रवासी मोठ्या संख्येने असतात.

या परिस्थितीत या स्थानकाची विचित्र अवस्था पाहून जनता त्रस्त झाली आहे. या परिसरात मध्यपान आदी व्यसने करत दारूच्या बाटल्या, सिगारेट, तंबाखू, गुटखा आदींची पाकिटे येथे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. कचरा व घाणीच्या साम्राज्याने या परिसराला वेढले आहे. बस स्थानकाच्या शेडचे मोडकळीस आलेले साहित्य टाकण्यात आले आहे.

कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्या फंडातून सुमारे 25 लाख खर्च करून दुमजली स्वच्छतागृह बांधले गेले असून त्यापैकी वरचा मजला निवासी आहे. खालच्या मजल्यावर महिला व पुरुषांसाठी वेगळे स्वच्छतागृह असून नसल्यासारखे आहे. स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव स्वच्छतेची मारामारी तसेच दरवाजे तोडलेले, फुटलेले, ड्रेनेजची व्यवस्था नाही.

या ठिकाणी रखवालदार म्हणून राहणारी व्यक्ती महिला स्वच्छतागृहास कुलूप लावून स्वतःकडे फक्त आपल्या कुटूंबासाठी त्याचा वापर करतो. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी हे नको त्या ठिकाणाचा गैरवापर करतात. सदर जागा छावणी परिषदेची होती. ती मनपाला वाहन व्यवस्थेकरीता देण्यात आली. तरी या ठिकाणी स्वच्छतेची बोंबाबोंब आहे.

सभोवताली मोठ्या प्रमाणात अतिक्रमीत टपऱ्या उभारलेल्या असून त्याचा मोठ्या प्रमाणात अनैतिक व्यवसायासाठी उपयोग होतो. त्यामुळे जनता त्रस्त आहे. सदर टपऱ्यांबाबत पी.एम.टी. कानावर हात ठेवते. तसेच छावणी परिषद कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला देखील बेकायदेशीर हातगाड्यांचा धुमाकुळ आहे.

तसेच मोठ्या प्रमाणात ह्या भागातून आजूबाजूला ५ शाळा २ महाविद्यालये व वेगळी महिला विद्यालये आहेत. त्यामध्ये ठराविक मुले या बसस्थानकावर सतत गोंधळ घालत असतात. याबाबत पी.एम.टी. चे वाहतूक नियंत्रक आणि वरिष्ठांकडे तक्रार केली, पोलिसांना कल्पना दिली. तरीही कोणत्याही स्वरूपाची ठळक कार्यवाही नाही.

एखादी राऊंड महिला पोलिस व अन्य पोलिस मारतात परंतु कसलाही परिणाम नाही. महाविद्यालयीन मुले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी तसेच मुलींची चेष्टा, मस्करी करीत असल्याची तक्रार वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांना प्रवासी महिलांनी केली, तरीही सोय होत नाही. तसेच पी.एम.टी.चे २-३ दुकाने कुलूप लावून आहेत. त्याचा उपयोग होत नाही.

सर्वसामान्य जनतेला या स्थानकावर कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही. कर्मचारी सुद्धा हवालदील आहेत. वाहतूक नियंत्रक अधिकारी देखील त्रस्त झालेले आहेत. अद्याप या स्थानकावर कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. पाणी मिळत नाही. स्वच्छतेसाठी पाणी नाही. परंतु इमारतीत रक्षणाच्या नावाखाली राहणाऱ्याला मात्र सर्व मिळते.

सदर स्वच्छतागृह महिला व पुरुषांकरीता वेगळे-वेगळे असताना कोणत्याही प्रकारचे नामफलक नसल्याने गोंधळ होतो. नाईलाजास्तव प्रवासी नको त्या ठिकाणी आपली सोय करून घेतात. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

प्रकाश मारणे- प्रवासी

बस स्थानक व स्वच्छतागृहात स्वच्छता झाली पाहिजे, हे आरोग्यास घातक आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रचंड दुर्गंधीमुळे आत जाण्याची इच्छा होत नाही.

कविता खंडाळे - प्रवासी

महिलांच्या स्वच्छतागृहात नळकोंडे तुटलेले आहेत. अजिबात पाणी नाही. दुर्गंधीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. दरवाजेही तुटलेल्या अवस्थेत आहे. येथील परिस्थिती पाहता बसस्थानक हे मध्यपीचा अड्डा झाला आहे. महिला व मुलींच्या बाबतीत येथे सुरक्षा वाटत नाही.

या संबंधित पीएमपीएमएल चे मुख्यअभियंता दत्तात्रय तुळपुळे म्हणाले की नागरिकांच्या मागणीनुसार आमदार निधीतून आधुनिकीकरणाचा या बसस्थानकासाठी प्रस्ताव आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे. यावेळी किरकोळ दुरुस्तीच्या ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याची कामे त्वरित करण्यात येईल.

यावेळी आमदार सुनील कांबळे म्हणाले की, याठिकाणी नागरिकांना अनेक सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून हे बसस्थानकाचे नूतनीकरण करणार आहोत. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT