mp Supriya Sule sakal
पुणे

Malegaon News : सुप्रिया सुळे यांनी केली लोकसभेच्या विरोधी उमेदवाराबाबतची भूमिका स्पष्ट

'आमच्याच कुटुंबियांपैकी अथवा मला माहित नाही कोणता चेहरा माझ्या विरोधात उभा राहणार आहे. मी लोकशाहीमध्ये काम करते. कोणीतरी माझ्या विरोधात लढलेच पाहिजे.

कल्याण पाचांगणे

माळेगाव - 'आमच्याच कुटुंबियांपैकी अथवा मला माहित नाही कोणता चेहरा माझ्या विरोधात उभा राहणार आहे. मी लोकशाहीमध्ये काम करते. कोणीतरी माझ्या विरोधात लढलेच पाहिजे, तर त्या निवडणूकीमध्ये मज्जा आहे. ही लोकशाही असून दडपशाही नाही. तीन वेळा माझ्या विरोधात भाजपचे उमेदवार लढले आणि मी जिंकले.

आता चौथ्यावेळाही ते माझ्याविरुद्ध लढतील. त्यांचे मी स्वागतच करते.मेरीटवर पास होण्यात मजा आहे, कॉपी करून पास होण्यात काय मजा आहे,` अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी तुमच्या विरोधात पवार कुटुंबियांमधीलच विरोधी उमेदवार असेल का, या प्रश्नाला उत्तर दिले.

माळेगाव (ता. बारामती) येथे पत्रकार कट्ट्यावर शुक्रवार (ता. ६) रोजी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध प्रश्ननांवर दिलखुलासपणे आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी लोकसभा निवडणूक उमेदवार म्हणून पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावाचीच अधिकची चर्चा होत आहे, या प्रश्नावर सावध भूमिका घेत सौ. सुळे म्हणाल्या,` ही कोण चर्चा करते हे तुम्हाला माहिती आहे.

दिल्लीची अदृष्य शक्ती खरेतर ही चर्चा घडवून आणत आहे. आमच्या कुटुंबात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मीठाचा खडा कोण टाकते, तर ती दिल्लीची आदृष्य शक्ती होय.`` महाराष्ट्रात खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे जनतेसाठी उल्लेखनीय कार्यकतुर्त्व सिद्ध करणारे एनसीपीमध्ये एकमेव अजितदादांचेच नाव घेतले जाते.

हा कतुर्त्वान चेहरा हा देवेंद्र फडणविस यांच्याबरोबर आला आहे, आता भाजपला आगामी निवडणूका जिंकण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही, असे विधान आमृता फडणविस यांनी केले होते. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता सौ. सुळे म्हणाल्या,` लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि नोंदविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यापेक्षा मी या विषयी अधिक काही बोलू शकत नाही.`

अजितदादांना योग्यवेळी पाच वर्षे मुख्यमंत्री करण्याची आम्हाला संधी मिळणार आहे, अशी निर्णायक भूमिका देवेंद्र फडणविस यांनी नुकतीच स्पष्ट केली होती. त्यावर सुळे म्हणाल्या,` दादाबद्दल जे शब्द काढले त्याबद्दल मी खरेच देवेंद्रजींचे आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते. ज्यावेळी दादा मुख्यमंत्री होतील त्यावेळी मी एकच देवेंद्रजींना विनंती करेल, की पहिला हार दादाला मला घालण्याची संधी द्या म्हणून.

भाजप हा मोठा भाऊ या नात्याने मित्रपक्षासाठी मुख्यमंत्री पदाऐवढा मोठा त्याग करते आहे, त्याबद्दल त्या पक्षाचे मनापासून आभार मानते. तसेच त्याच्या पक्षातील कष्ठ करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्य़कर्त्यांचे मनापासून कौतूक करते की ऐवढा त्याग ते करू शकतात.

काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी ६० वर्षे ज्या भाजपने प्रयत्न केले, अर्थात त्याच काँग्रेसच्या विचार धारेचा मुख्यमंत्री तुम्हा मान्य आहे त्याबद्दल भाजप पक्षाचे निश्चितच कौतूक करावे तेवढे थोडे आहेत. त्याच बरोबर ६० वर्षे संघर्ष केला, सतरंज्या उचलल्या, आंदोलन केली आणि जेव्हा चांदीच्या ताटात जेवण करण्यास बसायची वेळ येते तेव्हा तुम्ही मित्र पक्षाला ऐवढा मोठा मानसन्मान देता, याबाबत धन्यती भारतीय जनता पार्टी आणि त्याचे आमदार.`

पवारांमध्ये कौटुंबिक वातावरण चांगले...

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राजकारणाची दिशा आणि पवार कुटुंबियांची दिशा काहीसी बदलल्याचे दिसते. विशेषतः बारामतीत बहुतांशी कार्य़कर्त्यांना पवारसाहेबांचा की अजितदादांचा झेंडा हातात धरायचा, याबाबत संभ्रम आहे. तो धागा पकडत पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना अनेक कौटुंबिक प्रश्न विचारले.

त्यामध्ये दिवळीला परंपरेनुसार अजितदादा, पवारसाहेब आणि आपण लोकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी एकत्र असणार का, त्यावर सुळे यांनी अर्थातच ही परंपरा पुढेही अशीच सुरू रहावी यासाठी मी देवाकडे प्रर्थना करते. अजितदादा, राजेंद्र दादा आणि सर्वच भावंडे, त्यांची कौटुंबिय आम्हा एकमेकांना आवडती आहेत, अशी उत्तरे देवून सुळे यांनी आमचे कौटुंबिक संबंध चांगले असल्याचे दाखवून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत भीषण अपघात; डम्परला कार धडकली, दोघांचा मृत्यू!

Mumbai Local News: रविवारी मेगाब्लॉक! कुठे, कधी, कसा? वाचा एका क्लिकवर!

Mahayuti: महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ; अजितदादा लढवणार सर्वात कमी जागा, तर शिंदेंना..!

Nvidia ने Apple ला टाकले मागे! ठरली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी

Latest Maharashtra News Updates : राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 11 ते 12 सभा होणार; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

SCROLL FOR NEXT