पुणे : कोरेगाव पार्कमधील (koregaon park) प्रख्यात ओशो आश्रमात (osho ashram) कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार होत असून, या बाबत पोलिस गुन्हा दाखल करीत नसल्याची तक्रार ओशो फ्रेंडस फाऊंडेशनने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ओशो आश्रमाची प्रशासकीय संस्था ही ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आहे. या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्टतंर्गत आहे. या संस्थेत कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी परकील चलन प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे. या व्यवहाराची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास त्यातून किमान एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार पुढे येऊ शकेल, असे फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त योगेश ठक्कर यांनी नमूद केले. (Malpractice at Osho Ashram Allegations seekers)
या प्रसंगी फाऊंडेशनचे किरण दुबे, आरती राझदन आदी उपस्थित होते. ठक्कर म्हणाले, ‘‘ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनने परदेशातून मोठ्या प्रमाणावर देणग्या गोळा केल्या आहेत. धर्मादाय आयुक्त आणि परकीय चलन विभागाच्या परवानगी शिवाय देशबाहेर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले आहेत. तसेच ओशो आश्रमाचा काही भाग विकण्याचा प्रयत्न झाला आहे. या बाबतचे सर्व पुरावे ७ जुलै रोजी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दिले आहेत. मात्र, त्या बाबत पोलिसांनी अद्याप काहीही कार्यवाही केलेली नाही.’’पोलिसांनी या बाबत सखोल चौकशी करून ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले.
या बाबत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे म्हणाले, ‘‘ओशो फ्रेंडस फाऊंडेशनचे योगेश ठक्कर यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर या बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.