manchar Former MP Shivajirao Adharao Patil MLA Mahesh Landge participated in sakal hindu samaj march pune sakal
पुणे

Pune : मंचर बंद; माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे यांचा मोर्चात सहभाग

पालकांनी मोबाईल टीव्हीपेक्षा अधिकवेळ मुलीना देवून त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करावी.”

डी.के.वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी (ता. २४) आयोजित केलेल्या मंचर शहर बंदला व्यावासायाकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा बंद मधून वगळण्यात आल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, समस्त हिंदू आघाडी अध्यक्ष मिलिंद एकबोटे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, आदी मान्यवर सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत शिवव्याख्याते निलेश भिसे यांनी हिंदू धर्म हा सर्वात श्रेष्ठ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “ दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या लव्ह जिहादच्या घटनांबरोबरच ठिकठिकाणी अंधश्रद्धेच्या जोरावर होणारी धर्मांतरणे, गोतस्करी व गोहत्या, गोमांस विक्री यासंदर्भातील आरोपींवर पोलिसांनी खुनाप्रमाणे गुन्हा दाखल करावा.

ज्या कुटुंबात विसंवाद आहे तेथे लवजिहाद सारखे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी कुटुंबातील संवाद वाढवा. पालकांनी मोबाईल टीव्हीपेक्षा अधिकवेळ मुलीना देवून त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करावी.”

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व जय श्रीराम या घोषणांनी परिसर दुमदुमू गेला होता. भाजपचे संघटक सरचिटणीस संदीप बाणखेले, अँड. स्वप्ना पिंगळे, अक्षय जगदाळे, अक्षय चिखले, विशाल थोरात, सुरज धरम, रामदास थोरात - भक्ते, गणेश खानदेशे आदींनी व्यवस्था पहिली.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्यासह दोन पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, साठ पोलिस अंमलदार, दहा महिला अंमलदार, पन्नास होमगार्ड,

आरसीपी पथक जुन्नर व एस.आर.पी.एफ कंपनी आदी तगडा बंदोबस्त येथे होता. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, सहय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्यासह १५ पोलीस गाड्या व दहा मोटार सायकल सतत गस्त घालत होत्या. अवसरी खुर्द, पेठ, लांडेवाडी, वडगाव काशिंबेग व परिसरातील गावात बंद शांतेत पार पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवृत्तीपूर्वी CJI DY Chandrachud आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Pune: पुणे पोलिसांनी 'या' टोळीला केले जेरबंद, वाचा काय होता गुन्हा

Corn Upma Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न उपीट, नोट करा रेसिपी

Kolhapur North : मधुरिमाराजेंनी माघार का घेतली? ईगो दुखावला, घरगुती समस्या की अन्य कारण..; उलटसुलट चर्चांना उधाण

Happy Birthday Virat Kohli : किंग कोहलीचे रेकॉर्ड तर तुम्हाला माहित्येय; आज भेटूया त्याच्या कुटुंबियांना, जाणून घेऊ त्यांच्याविषयी

SCROLL FOR NEXT