मंचर - भारत-चीन व पाकिस्तान सीमावर्ती जम्मू काश्मीर भागात हिंसाचार, भूकंप आणि इतर कारणांमुळे आई-वडील गमावलेल्या अनाथ झालेल्या मुलींची सहल मंचर (ता.आंबेगाव) येथे आली आहे.
त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्याशी संवाद साधला.मायेची उब मिळाल्याने मुली भारावून गेल्या होत्या. तर त्याच्या कुटुंबीयांवर ओढवलेले भयानक प्रसंग ऐकून उपस्थितांचे मने हेलावली.
अनाथ ३३० मुलींचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे काम बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन (बीडब्ल्यूएफ) ही संस्था गेल्या २६ वर्षांपासून करत आहे.
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आधिक कदम असून ते श्रीगोंदा येथील आहेत. बॉर्डरलेस फाउंडेशनचे वरिष्ठ सल्लागार मोरडे फूड्सचे अध्यक्ष हर्षल मोरडे (मंचर) यांनी सहलीचे आयोजन केले आहे.
त्यांनी सीएसआर फंडातून ३०० मुलींच्या वस्तीगृहाचे गृहाचे बांधकाम सुरु केले आहे. फाउंडेशनचे सल्लागार डॉ.विजय वळसे पाटील यांनी काश्मीरपासून मंचरपर्यत सहलीची व्यवस्था पहिली.
30 वर्षांहून अधिक काळ जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण झाली होती. विशेषत: भीतीच्या सावटामुळे मुलींच्या मनावर मोठा परिणाम झाला होता.
शैक्षणिक नुकसान होत होते. त्यासाठी अनाथ मुलींचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी कदम यांच्या संस्थेने काम सुरु केले.
सध्या 330 हून अधिक मुली वसतिगृहात असून त्यांची उच्चशिक्षणाची सोय केली जाते. अनेक मुली डॉक्टर,अभियंता व उच्च पदस्थ अधिकारी झाल्या आहेत.
मंचर येथे मोरडे फूड्स कंपनीचे अधिकारी निलेश शिंदे, भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मचे अधिकारी नकुल जगताप,
ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी विशाल काळे पाटील यांनी मुलींचे स्वागत करून संवाद साधला.त्यावेळी हसतखेळत उत्साही वातावरणात मुली दंग झाल्या होत्या.
“जम्मू-काश्मीरमध्ये आम्हाला मोकळ्या वातावरणात फिरता येत नव्हते. असुरक्षितता जाणवत होती. सर्वत्र लष्करी जवान खडा पहारा देत होते.
अश्या वेळी आमचे शिक्षण व संगोपन होणार किंवा नाही. या चिंतेत असतानाच आम्हाला बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनने मायेची उब दिली.
त्यामुळे जीवनाला भरारी मिळाली आहे.प्रशासनाच्या युद्ध पातळीवर उपाय योजना सुरु आहेत.
पण परस्थिती पूर्वपदावर येण्यास थोडा वेळ लागेल. महाराष्ट्रातील खुले वातावरण व येथील मुलींचा मनमोकळेपणाने असलेला वावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मंचर करांनी दिलेली मायेची उबआम्ही कधीही विसरणार नाही” असे सरबरजान (बीएचएमएस) व गुलशन आरा (अभियांत्रिकी शाखा) यांनी सांगितले.
अतिरेक्यांच्या हल्ल्यात संपूर्ण कुटुंबच उद्वस्त झालेत्यातून आम्ही वाचलो पण जीवन अंधारमय दिसत होते हे सांगतना अनेक मुलींच्या डोळ्यातून आलेले अश्रू पाहून उपस्थितांची मने हेलावून गेली.
आधिक कदम म्हणाले “जम्मू काश्मीर व कारगील भागात लष्करी दलासाठी २७ रुग्णवाहिका बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनने उपलब्ध करून दिल्या आहेत.
अतिरेक्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांवर उपचार व नेत्र शस्त्रक्रियेची कामे केली आहेत. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १५० हून अधिक मुलींचे विवाह करून दिले आहेत
”या संपूर्ण कामात मोरडे फूड्स कंपनीचे अध्यक्ष हर्षल मोरडे व डॉ.विजय वळसे पाटील यांचे योगदान मोठे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.