Farmer esakl
पुणे

Pune : आंबेगाव तालुक्यात पावसाने फिरवली पाठ; पीकांच्या चिंतेने शेतकरी हवालदिल

आंबेगाव तालुक्यात पावसाची दडी ,45 टक्के पेरण्या खोळबल्या, लागवड झालेले बटाटा व सोयाबीन पीक धोक्यात:शेतकरी हवालदिल

सकाळ डिजिटल टीम

मंचर : आंबेगाव तालुक्यातील १४३ महसुली गावात अजून पुरेश्या प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे अद्याप ४५ टक्के पेरण्‍या खोळंबल्या आहेत. २० हजार ३४४ हेक्टर क्षेत्रातील (५५ टक्के) पेरण्या झालेल्या आहेत. पण पूर्व भागातील बाजरीच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत. सोयाबीन, बटाटा आदी पिके पावसाअभावी धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच भाताची रोपे तयार झाली आहेत पण लागवड थांबली आहे.

“१५ दिवसांपूर्वी भाताची पेरणी झाली असून रोपांची वाढ सुरु आहे. गेल्या आढवड्यात पाऊस न झाल्याने शेतकरी काळजीत होते, पण शुक्रवार (ता.१४) पासून पाऊस सुरु झाला आहे. तयार झालेल्या रोपांची लागवड करण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून खाचरे पाण्याने भरणे आवश्यक आहे.”असे असाणे येथील शेतकरी धोंडू सखाराम गभाले यांनी सांगितले.

“सातगाव पठार भागात तीन हजार ८०० हेक्टर क्षेत्रात बटाटा लागवड झाली आहे. अजून ५०० हेक्टर क्षेत्रात बटाटा लागवड होणार असून त्यासाठी पावसाची गरज आहे. वेळेत पाऊस न झाल्यास लागवड केलेले बटाटा पिक अडचणीत येऊ शकते.” अशी भीती पारगाव तर्फे खेड येथील शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील यांनी व्यक्त केली.

“खरीप हंगामात सातगाव पठार भागातील पारगाव तर्फे खेड, पेठ, भावडी, कुरवंडी, कोल्हारवाडी, कारेगाव, थुगाव आदी गावात मुख्य पिक म्हणून शेतकरी बटाटा पिक घेतात. पण गेल्या वर्षाच्या तुलनेने फारच अल्पशा पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.” असे अशोक रामदास बाजारे यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात लोणी, धामणी, पहाडदरा, वडगावपीर आदी आठ गावात पाऊस नसल्याने एक हजार हेक्टर क्षेत्रातील बाजरीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

“घोड व मीना नदी काठावरील तसेच उजव्या व डाव्या कालव्याचे पाणी उपलब्ध झालेल्या ३५ ते ४० महसुली गावात शेतकऱ्यांनी प्रामुख्याने गुरांसाठी चारा पिके, भाजीपाला व तरकारी आदी पिके घेतली आहे. शाश्वत पाणी उपलब्ध झाल्याने सध्या ही पिके सुस्थितीत असली तरी दीर्घ काळासाठी ओढ्यानाल्यांना पूर येण्यासाठी पावसाची गरज आहे.”असे आदर्शगाव गावडेवाडी येथील शेतकरी मच्छिंद गावडे यांनी सांगितले.

चौकट

“आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामाचे सरासरी ३६ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे.५६ आदिवासी महसुली गावे आहेत. पाच हजार १५० हेक्टरवर भात शेती केली जाते. ही शेती मान्सूनवर अवलंबून आहे. पूर्व भागात बाजरीच्या पेरण्या व सातगाव पठार भागात काही प्रमाणात बटाटा लागवड क्षेत्र खोळंबली आहे. पावसाच्या सरसरीत लक्षणीय घट झाली आहे.”

-एन.डी वेताळ प्रभारी कृषी अधिकारी आंबेगाव तालुका

“मृग व आर्दा नक्षत्रात जेमतेम पाऊस झाला. पुनर्वसु नक्षत्र बुधवार (ता.१९) पर्यंत आहे. पण त्याने देखील निराशा केली. गुरवारी (ता.२०) पुष्य नक्षत्र सुरु होणार आहे. त्यामध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे.”

-रविंद्र त्रिवेदी पौराहित्य मंचर (ता.आंबेगाव)

महसूल मंडळ नाव

पडलेल्या पावसाची टक्केवारी (ता.१ जुलै ते ता.१४ जुलै २०२३) पडलेल्या पावसाची टक्केवारी (जुलै महिना २०२२)

घोडेगाव २१.१ टक्के १६६.४ टक्के

आंबेगाव ८४.३१ टक्के ३११.४ टक्के

कळंब ७.६ टक्के १०५.७ टक्के

पारगाव २.८ टक्के १२३ टक्के

मंचर ७.३ टक्के ११८.९ टक्के

सरासरी २४.६ टक्के १६५.२ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT