Leopard Death sakal
पुणे

Leopard Death : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दीड वर्षाच्या बिबट मादीचा मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव -खडकी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील मधला मळा येथे दीड वर्षाच्या बिबट मादीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

डी. के. वळसे पाटील

मंचर - आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील मधला मळा येथे दीड वर्षाच्या बिबट मादीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन बिबट्यांनी एकमेकांना हाणामारी केल्यामुळे जखमी झालेल्या बिबट मादीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन खात्याकडून व्यक्त केला जात आहे.

जुन्नर वन विभागाचे सहाय्यक सहाय्यक संरक्षक अधिकारी संदीप शिंदे, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर, वनपाल शशिकांत मडके, वनपाल प्रदीपऔटी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

शेतकरी लहू गीताराम बांगर यांच्या शेतात सदर बिबट्या आढळून आला. त्यांनी मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाला सदर घटनेची माहिती कळवली. वन खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. बिबट मादीचे शवविच्छेदन मंचर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन केले.

मृत मादी बिबट्याच्या चेहऱ्यावर दुसऱ्या बिबट्याने पंज्याने हल्ला केल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. हाणामारीत सदर मादी जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनपाल शशिकांत मडके यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान या भागात दोन ते तीन बिबट्यांचा वावर असून दिवसाही बिबट्यांचे दर्शन होते. अनेक कुत्र्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे

त्यामुळे वन खात्याने खबरदारीचा उपाय म्हणून या भागात तातडीने पिंजरे लावून बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मथाजी पोखरकर, उत्तम पोखरकर व गावकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT