ST Sakal
पुणे

Manchar News : मंचरजवळ एसटी गाडीच्या स्टेरिंगमध्ये बिघाड; मोठी दुर्घटना टळली

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता.आंबेगाव) येथे बुधवारी (ता.२८) दुपारी पुणे ते लासलगाव एस टी गाडीचे स्टेरिंगमध्ये बिघाड झाला.

डी. के. वळसे पाटील

मंचर - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता.आंबेगाव) येथे बुधवारी (ता.२८) दुपारी पुणे ते लासलगाव एसटी गाडीचे स्टेरिंगमध्ये बिघाड झाला. त्यामुळे एसटी गाडी रस्ता सोडून खड्ड्यात गेली. या अपघात स्थळाच्या पुढे ५०० मीटर अंतरावर उतारावर घोड नदीचा पूल होता. नशीब बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. एसटीमध्ये ७५ प्रवाशी होते. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.

मंचर बसस्थानकातून दुपारी तीनच्या सुमारास पुणे ते लासलगाव एस टी गाडी (एम १४ बी टी ४११८) नारायणगावच्या दिशेने जात होती. जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर एकलहरे गावाजवळ एसटी आल्यानंतर अचानक स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्याचे चालक निवृत्ती रामभाऊ हांडगे यांच्या लक्षात आले. रस्त्याच्या डाव्या बाजूला बाराफुटावर असलेल्या खड्ड्यात एसटी कोसळली. अनाहूतपणे घडलेल्या घटनेमुळे प्रवाश्यांची धांदल उडाली.

महिला, लहान मुले व जेष्ठ नागरिक फारच घाबरले होते.काही प्रवाशांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. हांडगे व वाहक एस.एस.सानप यांनी प्रवाश्यांना धीर दिला.त्यांची आस्थेवाइकपणे चौकशी केली. अन्य एसटी गाड्यातून प्रवाश्यांना पुढील प्रवासासाठी रवाना केले.

'महिलांना ५० टक्के एसटी प्रवासात सवलत आहे. त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात एसटी गाड्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने कालबाह्य झालेल्या एसटी गाड्यांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर थांबवावा. प्रवाश्यांच्या हितासाठी नवीन एसटी गड्या खरेदी कराव्यात. प्रवाशांना चांगली सुविधा देणे गरजेचे आहे.'

- रिना संतोष डोके, सदस्य एकलहरे ग्रामपंचायत.

'पुणे ते लासलगाव एस टी गाडीचा अपघात घोड नदी पुलाच्या अलीकडे ५०० मीटर अंतरावर झाला आहे. त्यामुळे अपघाताची मोठी दुर्घटना टळली आहे, पण अश्या घटना होऊ नये म्हणून राज्य परिवहन महामंडळाने नियमितपणे एसटी गाड्यांची तांत्रिक तपासणी करावी.'

- उषा रमेश कानडे, माजी सभापती आंबेगाव तालुका पंचायत समिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

SCROLL FOR NEXT