Pandurang Nighot  esakal
पुणे

Pandurang Nighot : मंचरचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग निघोट यांचा राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मान

डी.के वळसे पाटील

मंचर : मंचर-निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पंढरीनाथ निघोट यांनी ३३ वर्ष पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मुंबई- राजभवन येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निघोट हे शेतकरी कुटुंबातील आहेत. पोलीस शिपाई म्हणून त्यांची पोलीस दलात भरती झाली. गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर या नक्षलग्रस्त भागात त्यांनी कामाची सुरुवात केली. १९९२ मध्ये नक्षलग्रस्त भागात माओवादयाकडून पोलिस पथकावर झालेला जीवघेणा हल्ला परतवून लावण्यात निघोट यांचा सक्रीय सहभाग होता. १९९३ मध्ये मुंबई व २००६ मध्ये भिवंडी येथे झालेल्या हिंसाचार व जातीय दंगल आटोक्यात आणण्यासाठी तसेच शांतता व सलोखा निर्माण करण्याचे काम निघोट यांनी केले.

हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अशी त्यांना पदोन्नती मिळाली असून सध्या ते नवी मुंबई येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी ५० हून अधिक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. त्यांना पोलीस महासंचालक यांनी सन २०१६ मध्ये पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. पोलीस विभागाकडून त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेळोवेळी सात प्रशंसा पत्र देण्यात आली आहेत. या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले आहे. त्यांच्या कामगिरीचे मंचर शहर व परिसरातून कौतुक केले जात आहे.

“माझे वडील पंढरीनाथ निघोट व आई देवबाई निघोट निरक्षर होते. पण त्यांनी शेतमजुरी करून माझे पदवीपर्यंत शिक्षण मंचर येथे पूर्ण केले. ३३ वर्ष पोलीस दलात काम करत आहे. विविध गंभीर गुन्हे उघडकीस आणले. अतीउत्कृष्ट सेवा, जातीय सलोखा, गंभीर गुन्ह्यांची गतिमान उकल व तपास तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या सर्व कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती पोलीस पदक हा सर्वोच्च पुरस्कार मला मिळालेला आहे. हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.”

- पांडुरंग पंढरीनाथ निघोट, पोलीस उपनिरीक्षक.

मुंबई राजभवन : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग निघोट यांना “उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT