arrested in bribe case sakal
पुणे

Bribe Case : सात हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात; दोन खासगी संगणक चालकांनाही अटक

नोंद मंजूर करण्यासाठी दहा हजाराची मागणी करून सात हजार रुपये‌ स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने एका महिला मंडल अधिकाऱ्यासह दोन संगणक चालकांना रंगेहाथ पकडले.

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन - नोंद मंजूर करण्यासाठी दहा हजाराची मागणी करून सात हजार रुपये‌ स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने एका महिला मंडल अधिकाऱ्यासह दोन संगणक चालकांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका पंचवीस वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

जयश्री कवडे (मंडल अधिकारी, थेऊर), योगेश कांताराम तातळे (वय २२, रा. चौधरी पार्क, दिघी पुणे), विजय सुदामा नाईकनवरे (वय ३८, रा. नागपूर चाळ, येरवडा) दोघेही खासगी संगणक चालक अशी लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडलेल्यांची नावे आहेत.

लाचलूचपत पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईच्या आजीच्या वडिलांचे कोलवडी (ता. हवेली) गावात असलेल्या जमिनीची सात बारावरील नाव कमी केल्याचे दिसून आले होते. त्या नावे पुन्हा सातबारा उतारावर घेण्यासाठी तक्रारदार यांच्या आजी व त्यांच्या बहिणींनी हवेली तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता.

तहसीलदार यांनी तक्रारदार यांच्या आजीच्या आईची वडिलांची नावे सातबारा उतारावर नोंद करण्यासाठी कोलवडीचे तलाठी व थेऊरच्या मंडल अधिकारी यांना आदेश दिला होता. तलाठ्यांनी नोंद केलेला सातबारा मंजूर करण्यासाठी तक्रारदार थेऊर येथील मंडल अधिकारी कार्यालयात पाठपुरावा करत होते. त्यांना मंडल अधिकारी जयश्री कवडे यांची भेट घेतली. कवडे यांनी तक्रारदारास विजय नाईकनवरे यांना भेटण्यास सांगितले.

नाईकनवरे यांनी नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी यांच्यासाठी दहा हजार रुपयाच्या‌ लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पंचसमक्ष पडताळणी करुन लाचलुचपत विभागाने थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात सापळा लावला होता.

या वेळी योगेश तातळे, विजय नाईकनवरे यांनी पंचासमक्ष नोंद मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती सात हजार रुपये रक्कमेची मागणी केली. ही रक्कम स्वीकारत असताना पथकाने तातळे व नाईकनवरे यांना रंगेहाथ पकडले. या दोघांकडे‌ चौकशी‌ केल्यानंतर त्यांना मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी लाच स्वीकारण्यास‌ सांगितल्याचे पथकाला सांगितले. या तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपतचे प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले यांच्या पथकाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT