mango festival sakal
पुणे

मार्केटयार्ड येथे एक एप्रिलपासून आंबा महोत्सव

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’योजनेअंतर्गत ‘आंबा महोत्सवाचे’आयोजन एक एप्रिलपासून गुलटेकडी मार्केटयार्ड येथे करण्यात आले आहे, अशी माहिती पणन संचालक सुनील पवार यांनी दिली.

विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा, या उद्देशाने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कोरोना परिस्थितीमुळे गतवर्षी महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. तथापि यावर्षी पुण्यासह राज्यभरात आंबा महोत्सवांचे आयोजन करण्याच्या सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या होत्या.

पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव आयोजनास पुण्यापासून सुरवात करण्यात येत आहे. सुरूवातीस रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादक यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच हंगामानुसार पुढे राज्यातील केशर आंबा उत्पादकही सहभागी होणार आहेत.

हा महोत्सव ग्राहकांच्या सोईसाठी गुलटेकडी, मार्केटयार्डच्या प्रवेशद्वार क्रमांक ९ येथील पीएमपीएमएल बस डेपोसमोरील वखार महामंडळाच्या मोकळ्या जागेत सुरू करण्यात येत आहे. महोत्सव ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. पणन मंडळाकडे बहुतांश हापूस आणि केशर आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुमारे ५१ स्टॉल आंबा उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी या महोत्सवास भेट देऊन थेट उत्पादकांकडून आंबा खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT