मनोज जरांगे यांच्यावर १० वर्षांपूर्वीच्या एका नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. २०१३ मध्ये या प्रकरणाची नोंद झाली होती आणि जून महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतु, जरांगेंनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे कोर्टासमोर हजर होण्यास असमर्थता दर्शवली होती.
मनोज जरांगे उपोषणाला बसले होते आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात किडनीच्या इन्फेक्शनमुळे ते दाखल झाले होते आणि डॉक्टरांनी त्यांना २ आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते कोर्टासमोर हजर होऊ शकले नव्हते.
डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचा सल्ला दिल्यामुळे ते आज अॅम्ब्युलन्समधून कोर्टासमोर आले. कोर्टासमोर त्यांनी आपली प्रकृतीची माहिती देत अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. डॉक्टरांच्या अहवालावर आधारित कोर्टाने त्यांचे अटक वॉरंट रद्द केले.
कोर्टाने जरांगेंना न्यायालयाचा अवमान पुन्हा करू नये, अशी ताकीद दिली आहे. काही माध्यमांमध्ये जरांगेंनी कोर्टाबद्दल अवमानकारक भाष्य केले होते. न्यायालयाने त्यांना बोलताना काळजी घ्यावी, अशी सूचना दिली आहे.
जरांगेंच्या प्रकरणात न्यायालयाने कायद्याचे योग्य पालन करत, जरांगेंच्या वैद्यकीय अहवालांची तपासणी केली. सरकारी वकीलांनी जरांगेंच्या अनुपस्थितीबद्दल आक्षेप नोंदविला होता, परंतु वैद्यकीय अहवालावरून कोर्टाने अटक वॉरंट रद्द केले. कोर्टाने जरांगेंना नव्याने बंद पत्र देण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ सप्टेंबरला होणार आहे. न्यायालयाने जरांगेंना यावेळी न्यायालयाचा अवमान करु नये, अशी समज दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.