Manoj Jarange Patil pune news esakal
पुणे

Manoj Jarange Patil: पंकजा मुंडेंनी माझे आभार मानले पाहिजे...२९ तारखेला घेणार मोठा निर्णय! मनोज जरांगे पुण्यात काय म्हणाले?

Sandip Kapde

पुणे: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनजागृती व शांतता रॅलीला पुण्यात सहा तासांच्या विलंबाने सुरुवात झाली. या रॅलीत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. सकाळपासूनच भर पावसात मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहणारे समर्थक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

पंकजा मुंडे आणि विधान परिषद

मनोज जरांगे पाटील यांनी साम टिव्ही सोबत बोलताना पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेच्या निवडीवर भाष्य केले. "पंकजा मुंडे यांनी माझे आभार मानले पाहिजे, त्यांना विधान परिषद तरी भेटली मी त्यांना पडा असं बोललो नाही," असे त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरावर भाष्य नाही

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना मनोज जरांगे यांनी काही भाष्य न करण्याचा निर्णय घेतला. "प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पुढं काही होऊ शकतं," असे त्यांनी नमूद केले.

आरक्षणाची लढाई

"मी पुण्यातील समाजाचा आभार मानतो, आरक्षणाच्या लढ्यामध्ये माझ्यासोबत ते राहिले. ही लढाई माझी एकट्याची नाही, सर्व समाजाची आहे, आणि मी समाजासोबत शेवटपर्यंत राहणार आहे," असे जरांगे म्हणाले. तसेच, अनिल बोंडे आणि देवेंद्र फडणीस यांच्या विधानांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचे वचन दिले.

आगामी निवडणुकीत मराठा उमेदवार

"आरक्षण मिळवायचे असेल तर आपली माणसे विधानसभेत हवीत. २८८ जागांची चाचपणी पूर्ण झाली आहे, लवकरच आमचे उमेदवार पुढं येतील," असे त्यांनी सांगितले. तसेच, २९ तारखेला अंतरवली येथे मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले.

समाजाच्या आरोपांची निंदा

"ओबीसी समाजातील काही लोक आणि मराठा समाजातील काही लोक मला बदनाम करत आहेत," असे सांगत त्यांनी या आरोपांची निंदा केली. "सर्व सामान्य लोकांचं सरकार आणणार," असे आश्वासन देत जरांगे यांनी समाजाच्या हितासाठी लढण्याचे वचन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

Phulambri Vidhansabha Constituency : मतदाराच्या पसंतीवरच ठरणार काँग्रेसचा उमेदवार..! सर्वेत ज्याचे नाव अगोदर, तोच ठरणार बाजीगर

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Live Updates: नानासाहेब परुळेकरांच्या जयंतीनिमित्त नितीन गडकरींचं भाषण

SCROLL FOR NEXT