supriya sule  sakal
पुणे

Supriya Sule : मराठा, धनगर, लिंगायत आरक्षणावर लोकसभेत चर्चेसाठी वेळ द्या

महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत, आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर लोकसभेत चर्चा करण्यासाठी वेळ मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक्स या (पुर्वाश्रमीचे ट्विटर) सामाजिक माध्यमांद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा व धनगर हे दोन्ही समाज या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे हे विषय संसदेत मांडले जाणे आवश्यक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची बहुमतातील सत्ता असूनसुद्धा या मराठा व धनगर या दोन्ही समाजांचा आरक्षणाचा प्रश्न जशाच्या तसा कायम आहे. यामुळे या दोन्ही समाजात प्रचंड अस्वस्थता आहे, यातूनच महाराष्ट्रात तरुण आत्महत्या करु लागले आहेत, असे सुळे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT