Rangrao Jadhav and Shantaram Jadhav Sakal
पुणे

Maratha Reservation : सख्या मावस बंधूंचे अनोखे आंदोलन; एकाने केला चप्पलचा त्याग, तर दुसर्याने दाढी व डोक्याचे केस न काढण्याचा घेतला निर्णय

राज्यात गेली तीन ते चार महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातुन पाठिंबा मिळत आहे.

सुदाम बिडकर

पारगाव - राज्यात गेली तीन ते चार महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातुन पाठिंबा मिळत आहे. ग्रामीण भागात देखील मराठा तरुण मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत.

आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील दोन सख्खे मावस बंधू त्यापैकी रंगनाथ जाधव यांनी गेली तीन महिने पासुन चप्पलचा त्याग केला असून जो पर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत चप्पल घालणार नाही असा पण केला आहे.

तर त्यांचे मावस बंधू शांताराम जाधव यांनी देखील गेली चार महिन्यांपासून दाढी, डोक्याचे केस न काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला असून जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत दाढी व डोक्याचे केस काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रंगनाथ जाधव आणि शांताराम जाधव या दोन भावांनी अनोखे आंदोलन करून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचे परिसरातून कौतुक होत असून त्यांच्या या प्रामाणिक आंदोलनाला लोक पाठिंबा देत आहेत. धामणी येथे सप्टेंबर महिण्यात झालेल्या साखळी उपोषणात देखील यांचा सक्रिय सहभाग होता. आजही त्यांनी आपला शब्द राखला असून जोवर आरक्षण मिळणार नाही तोवर हा त्याग कायम असेल असे त्यांनी सांगितले.

धामणी, शिरदाळे व पहाडदरा सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जे आंदोलन केले होते त्यात या बांधवांचा मोठा सहभाग होता.

शिवाय साखळी उपोषणाच्या वेळी देखील यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. तर पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेला हे दोन्ही भाऊ आवर्जून उपस्थित राहिले होते, असे मराठा आंदोलक मयुर सरडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT