devendra fadnavis and manoj jarange sakal
पुणे

Manoj Jarange Patil : मला गुंतविण्याचे देवेंद्र फडणवीचांचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही

'मला कायद्याच्या कचाट्यात गुंतविण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. पण मी ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.'

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'मला कायद्याच्या कचाट्यात गुंतविण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. पण मी ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.' अशा शब्दात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर जरांगे पाटील शुक्रवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने त्यांचे अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करून त्यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले.

जरांगे पाटील म्हणाले, 'उपोषणामुळे मला त्रास होत असल्याने मी सुनावणीसाठी रुग्णवाहिकेतून न्यायालयात आलो आहे.संविधान व न्यायाधीशांबाबत माझ्या मनात नितांत आदर आहे.न्यायालयाच्या निर्णयाविषयी आत्ताच काही बोलणार नाही'

रुग्णवाहिकेतून उपचार घेत न्यायालयात दाखल होत असतानाच, जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर जरांगे पाटील म्हणाले, 'माझी तब्येत कशी आहे, त्यास किंमत नाही. तर माझ्या समाजातील तरूणांच्या जिवाला किंमत आहे.

मी समाजासाठी रुग्णवाहिकेतून जाणार की अन्य वाहनातून, याला महत्त्व नाही. 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान माझा महाराष्ट्र दौरा पूर्ण होईल. माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असली, तरीही मी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय मी शांत राहणार नाही.'

तिसऱ्या आघाडीबाबत जरांगे पाटील म्हणाले, 'आगामी विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची गरज नाही. समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. गरिबांची लढाई लढायची आहे. एखाद्या उत्साही कार्यकर्त्याने आपण मुख्यमंत्री झाल्याचे फ्लेक्‍स लावले असतील, पण मला निवडणुकीत उभे राहायचे नाही. आम्ही गोरगरिबांना सत्तेत आणणार आहोत.'

प्रकाश आंबेडकर यांना आम्ही मानतो

'ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आम्ही मानतो आणि मानत राहणार आहोत. त्यांनी काय टीका करावी काय करू नये हा त्यांचा अधिकार आहे. ते आमच्या बाजूने नक्कीच लढतील, याची आम्हाला आशा आहे.

ओबीसी आमचे दुश्‍मन नाहीत. ग्रामीण भागातील दलित, आदिवासींबाबतही मी कधी काही बोललो नाही. ओबीसी नेते छगन भुजबळ हेच ओबीसी यांची वाट लावत आहेत,' असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT