Velhe Agitation for Maratha Reservation sakal
पुणे

Maratha Reservation : वेल्ह्यात मराठा आरक्षणासाठी प्रत्येक गाव करणार साखळी उपोषण

वेल्हे तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधवांनी मंगळवार (ता.३१) रोजी तहसील कार्यालया शेजारी साखळी उपोषण सुरु केले आहे.

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) - मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वेल्हे तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधवांनी मंगळवार (ता.३१) रोजी तहसील कार्यालया शेजारी साखळी उपोषण सुरु केले आहे. यामध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधव ही साखळी पद्धतीने उपोषण करणार आहेत.

मराठयांना आरक्षण मिळेपर्यंत वेल्हे येथे सर्वपक्षीय नेत्यांसह एकही आमदार, मंत्र्याना प्रवेश बंदी करण्याचा निर्धार वेल्हे तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. वेल्हे येथील लाक्षणिक उपोषणास समाजासह इतर समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गावबंदीचे फलकही लावण्यात आले आहेत.

मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला आंदोलकांनी पाठिंबा दिला आहे. वेल्हे तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधवांनी वेल्हे तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. तालुक्यातील सर्व गावातील ग्रामस्थांची यावेळी बैठक झाली.

दररोज एक गाव वेल्ह्यात येऊन साखळी उपोषण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जोपर्यत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यत साखळी उपोषण सुरु राहणार आहे. तहसिल कार्यालयासमोर घंटानाट सुरु असुन, गावोगावातील युवक यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT