पुणे

छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमले पिंपरी-चिंचवड

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजारो शिवप्रेमींनी केलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषाने पिंपरी-चिंचवड शहर दुमदुमून गेले. शिवरायांच्या प्रतिमेचे सकाळी पूजन करण्यात आले. काही शिवप्रेमींनी दुचाकीवरून फेरी काढली. संपूर्ण परिसर भगव्या रंगाने बहरून गेला.

खराळवाडीत कार्यक्रम
खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, पक्षप्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, वर्षा जगताप, सुनील गव्हाणे, विनोद कांबळे, कविता खराडे, वर्षा शेडगे उपस्थित होत्या.

काँग्रेसतर्फे प्रतिमापूजन
पिंपरी-अजमेरा कॉलनीतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोकराव मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. एमआयडीसी भोसरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. प्रदेश महासचिव अशोक मंगल, पुणे शहराध्यक्ष राजन पानसे, अमर नाणेकर, शहराध्यक्ष उमेश बनसोडे, प्रवक्ता आयुष मंगल, पराग आठवले, सोनू वाघमारे, श्वेता मंगल, नेहा मंगल, अक्षांश मंगल, मिताली चक्रवर्ती, राजेश नायर, साक्षी राणीम उपस्थित होते.

भोसरीत दुचाकी फेरी
भोसरीतील अमित झोंबाडे मित्रपरिवाराच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. लांडेवाडी चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास झोंबाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला; तसेच दुचाकी फेरी काढली. योगेश वाडेकर, मंजुनाथ बोरगी, अक्षय गुंजाळ, स्वराज मोहिते, आकाश फुगे, प्रतीक शेळके, तालिफ पठाण, शंकर भिसे, प्रज्ञेश पठारे, प्रथमेश वैद्य उपस्थित होते.

‘घरकुल’मध्ये शिवजयंती
चिखलीतील घरकुल स्वराज्य सोसायटीतील डी-२९ सर्वधर्मीय महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली. शफी मणियार यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी राजश्री वीर होते.

ग्रंथालयाच्या वतीने कार्यक्रम 
डीएसपी प्रतिष्ठान व लताबाई पवार सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने शास्त्रीनगर-रहाटणीत शिवजयंती साजरी करण्यात आली. ॲड. केशव घोगरे, तुकाराम  शिंदे, अनिल पानसरे, संतोष पानसरे, मयूर पवार, सचिन राऊत, गणेश पांचाळ, अशोक देशमुख उपस्थित होते. अश्‍पाक सुतार, आकाश पवार व चेतन पवार यांनी 
संयोजन केले. 

सोनवणे शाळेतर्फे मिरवणूक 
महापालिका कै. विठ्ठलराव सखाराम सोनवणे प्राथमिक डिजिटल शाळा क्र.९३ सोनवणे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांची वेशभूषा करीत ‘जय शिवाजी -जय भवानी’ अशा घोषणा देत मिरवणूक काढली. सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, तरुण मित्र मंडळ, सर्व शिवभक्तांनी जयंती साजरी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर केले.

भक्ती-शक्ती समूह शिल्प 
भक्ती-शक्ती समूह शिल्प येथे सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीने शिवजन्मानिमित्त पाळणा उभारण्यात आला. शिवजयंतीनिमित्त पूर्वसंध्येला आतषबाजी व मशाल दीपोत्सव साजरा करण्यात आला. बाल शिवबा, वारकरी पथक आणि ढोल पथकाच्या तालावर मिरवणूक काढली. बाल शिवबा स्पर्धेतील विजेत्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. 
 
एचए कॉलनीत पूजन 
समाजवादी पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर पुणे जिल्हा युनिटतर्फे एचए कॉलनीतील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शहराध्यक्ष रफीकभाई कुरेशी, भोसरी विधानसभा अध्यक्ष जावेद शहा, रवी यादव, रामरूप यादव, मतान कुरेशी, महिला शहराध्यक्ष मनोरमा काळे उपस्थित होते.

काळेवाडीत पोवाडे, प्रेरणागीत सादर 
शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने काळेवाडीतील तापकीर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. पोवाडे, प्रेरणागीत सादर करण्यात आले. संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर, सभासद नितीन पवार, छावा युवा मराठा महासंघ अध्यक्ष धनाजी येळकर-पाटील, काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे संस्थाध्यक्ष विवेक तापकीर, दयावान सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गवारे, शेतकरी कामगार पक्ष भालचंद्र फुगे, प्रशांत सपकाळ, अर्चना मेंगडे उपस्थित होते. कै. श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिराच्या प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार व उल्का जगदाळे यांनी आभार मानले.

‘अल्पसंख्याक आघाडी’तर्फे पूजन
रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने एचए कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्यास शहराध्यक्ष खाजाभाई शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिद्धी हिलाल, दर्या सारंग,  दौलत खान, इब्राहिम खान, काझी हैदर, सिद्धी इब्राहिम, नूरखान बेग, श्‍यामा खान, हुसेन खान, शेखलाल नदाफ, इक्‍बाल अन्सारी, हाजी नदाफ, सलीम सय्यद, मेहबूब बळगानू, ताहीर शेख उपस्थित होते.
‘आयआयबीएम ग्रुप’मध्येही उत्साह आयआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष धनंजय वर्णेकर, संचालिका शीतल वर्णेकर, विभागप्रमुख अमोल भागवत, नगरसेवक कुंदन गायकवाड, डॉ. प्रशांत शेलार, संतोष घाडगे, सागर पाटील, अतुल पुंडे, प्रतीक्षा डफळ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भगवा फेटा बांधून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

चऱ्होलीत बालशिवबा
चऱ्होली परिसरात ‘एक गाव, एक शिवजयंती’ बालशिवबांनी मोठ्या आनंदात साजरी केली. वडमुखवाडी, चऱ्होली, चोविसावाडी येथील रस्त्यांवर सायकली घेऊन, तर कुठे समूहाने एकत्र जमून त्यांनी एकीचे दर्शन घडविले. 

दिघीत पथनाट्य
दिघी येथील भारतमातानगरमध्ये मोरया ग्रुपने छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील समाधी स्थळावरून आणलेल्या ज्योतीचे जोरदार स्वागत केले. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवरायांचा वेश परिधान केलेल्या मुलांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा संदेश पथनाट्यातून दिला. व्याख्याते ज्ञानेश्‍वर फुसे यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर मिरवणूक काढली. अतुल राक्षे, निखिल पाटील, प्रल्हाद ठाकूर, पंकज शिंदे, रोहित इंगळे, मनोज आठवले, रोहित अग्रवाल, फारुख शेख यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT