Pune Market Yard  sakal
पुणे

Pune Market Yard : मार्केट यार्डातील डमी अडत्यांवर होणार कारवाई - दिलीप काळभोर

मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यावर डमी अडत्यांची संख्या वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यावर डमी अडत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गाळ्यावरील नियमबाह्य डमी अडत्यांवर मंगळवारपासून पासून बाजार समिती प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या 15 फुटाच्या नियमाबाबतही दररोज कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस सभापती दिलीप काळभोर, उपसभापती सारिका हरगुडे, संचालक दत्तात्रय पायगुडे, संचालिका मनिषा हरपळे, सचिव डॉ. राजाराम धोंडकर उपस्थित होते. शेतकरी मारहाण प्रकरणानंतर बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी पत्रकार परिषद घेत डमी आडत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर केले. डमी अडत्यांमुळे बाजारात दिवसभर किरकोळ विक्री सुरू होती.

डमी अडत्यांना आळा घालण्यासाठी एका गाळ्यावर दोन मदतनीस ठेवता येतील असा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र पुन्हा डमी आडत्यांची संख्या वाढल्याने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काळभोर यांनी सांगितले.

काळभोर म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसराचा वाढता विस्तार पाहता या दोन्ही शहरांभोवतीच्या महामार्गालगत उपबाजार उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. शहरामध्ये येणाऱ्या सर्व महामार्गालगत उपबाजार उभारण्याचे धोरण आहे. यामुळे शहरात येणारी मोठी येणार नाहीत आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळेल.

कोरेगाव मुळ 11 एकर जागा, खेड शिवापूर 5 एकर, उत्तमनगर 4 एकर, पेरणे 10 एकर आदि ठिकाणांचा विकास आराखडा केला जात आहे. मोशी येथील उपबाजारातील सात एकरवर 270 कोटी रूपयांचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे.

डमी अडत्याला बाजारात बंदी

फळबाजारात एका डमी अडत्याने शेतकर्‍यांना मारहाण केल्याचा नुकताच प्रकार उघडकीस आला आहे. त्या डमी आडत्याला बाजार प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच ज्या गाळ्यावर डमी अडत्या होता. त्या गाळा मालकाला नोटिस देवून खुलासा मागविला आहे.

खुलासा समाधानकारक न वाटल्यास काही दिवस परवाना रद्दची कारवाई केली जाईल. ज्या शेतकर्‍यांना मारहाण झाली त्या शेतकर्‍यांनीच तक्रार देण्यास नकार दिला आहे. त्या शेतकर्‍यांनी मारहाण झाल्याची तक्रार दिल्यास पोलिस कारवाई करता येईल. अशी माहिती सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी दिली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांची बाजार समिती आहे. त्यामुळे बाजारात शेतकर्‍यांवर अन्याय झाला, तर त्यास न्याय मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय झाल्यास त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता बाजार समितीकडे तक्रार करावी. बाजार समिती कायम शेतकर्‍यांच्या पाठिशी उभी आहे. बाजार आवारात शेतकर्‍यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.

शेतकरी हिताच्या धोरणाला गती

संचालक मंडळामुळे बाजार समितीतील निर्णयास गती आली आहे. तसेच शेतकरी हिताच्या व बाजार विकासाच्या धोरण आखणीला वेग आला आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहारात पारदर्शकता आली असून शेतकर्‍यांसह बाजार घटकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण केले जात आहे.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT