abdul sattar sakal
पुणे

Abdul Sattar : सभापतींकडे पुन्हा सह्यांचे अधिकार,बाजार समितीतील तिढा सुटला; पणनमंत्र्यांकडून ठरावाला स्थगिती

Abdul Sattar : कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याच्या ठरावाला पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थगिती दिली आहे, त्यामुळे पुन्हा सभापती दिलीप काळभोर यांच्याकडे सह्यांचे अधिकार आले आहेत. या निर्णयामुळे समितीच्या कार्यपद्धतीत स्थिरता येण्याची अपेक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव दहा संचालकांनी बहुमताने मंजूर केला होता. या ठरावाला पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे सभापती दिलीप काळभोर यांच्याकडे पुन्हा सह्यांचे अधिकार आले आहेत.

याबाबत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्याचा ठराव सात ऑगस्टला बहुमताने मंजूर झाला होता. तर सहा सप्टेंबरला संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत झालेले ठराव २४ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत कायम करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक होणार होती. मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत पणन मंत्र्यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.

सभापती दिलीप काळभोर यांनी कलम ४३ अन्वये पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी घेऊन निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

सभापती समितीच्या कामकाजात सर्व संचालकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत त्यांच्या सह्यांचा अधिकार काढून तो अन्य संचालकाकडे देण्यासाठी बैठकीची मागणी दहा संचालकांनी केली होती. त्यावर पणन संचालक, उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण गेल्यानंतर यावर अखेर ७ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव १८ पैकी १० संचालकांच्या बहुमताने ठराव संमत झाला होता.

त्यात बैठकीत सह्यांचे अधिकार संचालक प्रशांत काळभोर यांना दिले होते. मात्र, सह्यांचे अधिकार काढण्याची तरतूद कायद्यात नसल्याचा दावा करत सभापतींनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. मात्र सुनावणी पूर्ण होऊन देखील निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्यामुळे सभापतींनी कलम ४३ अन्वये पणन मंत्र्यांकडे अपील दाखल केले होते.

निर्णयाला पणन मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा सभापतींकडे सह्यांचे अधिकार गेले आहेत. आदेशानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT