पुणे

Work From Home करणाऱ्या मोहन जोशींनी घराबाहेर पडावं : महापौर

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे: 'लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी गायब आहेत. कोरोनाच्या काळात आम्ही लोकांची सेवा करत होतो तेव्हा मोहन जोशी घरात बसले होते. केवळ प्रसिद्धीसाठी भाजपवर आरोप करू नये. 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्या मोहन जोशींनी आधी पुणेकरांच्या मदतीसाठी घराबाहेर पडावे', असं खरमरीत टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

सिरमचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी पुणे शहराला विशेष प्रमाणात लस देण्यासाठी केंद्राने परवानगी दिली नसल्याचा दावा नुकताच केला होता. त्याचाच आधार घेऊन काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी पुणे भाजपवर निशाणा साधत, 'पूनावाला यांचे ऐकूण भाजपचे नेते हलतील का?' असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर पुणे शहराला लस मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणाऱ्या महापौर मोहोळ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, 'मोहन जोशी यांना पुणेकर तर सोडाच पण पुणे काँग्रेसमधील नेतेही गांभीर्याने घेत नाहीत. मोहन जोशी शहरातील ज्येष्ठ नेते असले तरी त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी आणि पुणेकरांच्या विस्मरणात जावू नये, म्हणून आरोप करु नयेत. पुणेकर ज्यावेळी कोरोना संकटाचा सामना करत होता; ऑक्सिजन, बेड्स, रुग्णवाहिका आणि रेमडेसिव्हीर मिळवण्यासाठी सर्वानाच संघर्ष करावा लागत होता, तेव्हापासून मोहन जोशी यांनी 'वर्क फॉर्म होम' हीच पद्धत अवलंबली आहे. जी आजतागायत सुरु आहे. संकटात पुणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या जोशींनी लोकसभा संपल्यानंतर पुणेकरांकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, ही वस्तुस्थिती पुणेकर जाणतात'.

'पुणेकरांना अधिकची लस मिळावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, जे अजूनही सुरु आहेत. सिरम इन्स्टिट्यूट पुण्यात असल्याने आपण अधिकच्या डोसची मागणी करत आहोत. सायरस पूनावाला यांनी 'सिरम'च्या माध्यमातून केंद्र सरकारला पुण्यासाठी अधिकच्या लस देता येईल का? या संदर्भात पत्र लिहिले, ते पत्रही आमच्या विनंतीवरुन लिहिले होते. याची कल्पनाही जोशी यांना नाही. केंद्र सरकारचे लस वितरणाचे धोरण संपूर्ण देशासाठी लागू असल्याने पुण्यासाठी म्हणजेच थेट महापालिकेला लस देण्याचा निर्णय घेण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. ही वस्तुस्थिती जोशी यांना ज्ञात असूनही ते राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या प्रकाराला पुणेकर थारा देणार नाहीत, हा विश्वास आहे. शिवाय केंद्र सरकार हे राज्य सरकारला लशींचा पुरवठा करते. मग मोहन जोशी यांनी राज्य सरकारकडे पुण्यासाठी अधिकच्या लशींची मागणी केल्याचे, ऐकिवात नाही,' असेही महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

'सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी ही खरे तर राज्य सरकारची जबाबदारी असते. मात्र यात आम्ही अजिबातही राजकारण केले नाही. राज्य सरकारने एक रुपयांचाही निधी किंवा आरोग्य सुविधा महापालिकेला दिल्या नाहीत. आज पुणेकरांसाठी खोटा कळवळा दाखवणारे जोशी यांनी त्यांचा पक्ष सहभागी आलेल्या महाविकास आघाडीकडे मदतीसाठी तोंड का नाही उघडले?, असा सवालही महापौर मोहोळ यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT