Meeran Chadha Borwankar EX IPS Madam Commissioner  esakal
पुणे

Meeran Chadha Borwankar : पुण्यातील 'वैकुंठ मेहता' जागेवर नक्की कुणाचा डोळा? मीरा बोरवणकरांच्या पत्रकार परिषदेतून नवा प्रश्न समोर

माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर पुस्तकातून जे खुलासे केले आहेत ते भलतेच धक्कादायक आहेत.

युगंधर ताजणे

Meeran Chadha Borwankar EX IPS Madam Commissioner : माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर पुस्तकातून जे खुलासे केले आहेत ते भलतेच धक्कादायक आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोरवणकर यांनी स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन याविषयी अधिक माहिती दिली आहे.

पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री यांनी आपल्याला येरवडा येथील जमिन एका बिल्डरला हस्तांतरित करण्यास सांगितली होती. आपण त्याला नकार दिल्यानंतर आपल्यावर दबावही आणण्याचा प्रयत्न केला गेला. असा खुलासा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातून केला होता. त्यावर त्यांनी पत्रकार परिषदेतून त्यांची भूमिका मांडली आहे.

Also Read - Millet Food : हडप्पा संस्कृतीतील लोकही खात होते 'हे' अन्न

मला एक जणाचा मेसेज आला होता. त्यांनी मला सांगितले की, पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशेजारील वैकुंठ मेहता च्या जागेच्या व्यवहारासंदर्भात दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. अशा शब्दांत बोरवणकर यांनी वेगवेगळे खुलासे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं केले असून त्याबद्दल आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे.

बोरवणकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सरकारी जागा बळकावण्यात सरकार, नेते,पोलीस आणि बिल्ड़र यांचे व्यावहारिक संबंध गंभीर स्वरुपाचे असून ती बाब आपण अधोरेखित करत आहोत असेही बोरवणकर यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील अनेक माजी सनदी अधिकाऱ्यांनी तत्कालीन सरकाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर सडेतोडपणे भाष्य करण्याचे धाडस दाखवले आहे.

बोरवणकर यांनी यावेळी एका निवृत्त न्यायधीशांच्या नावाचा उल्लेख औरंगाबाद येथील जमिनीसंदर्भातील प्रसंग सांगितला. ती जागा देखील एका खासगी बिल्डरला हवी होती. त्यानंतर पुण्यातील वैकुंठ मेहताच्या जागेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातही अनेकांनी आपला इंटरेस्ट दाखवला होता. असा उल्लेख बोरवणकर यांनी यावेळी केला.

आतापर्यत ज्या सरकारी जागा खासगी बिल्डरला देण्यात आल्या आहेत त्या सर्व प्रकरणांची पुन्हा एकदा स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्यात यावी. अशी मागणी बोरवणकर यांनी याप्रसंगी केली.

एकीकडे केंद्रसरकार ईडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या नेत्यांवर कारवाई करत असताना आता एका माजी सनदी अधिकाऱ्यानं केलेल्या खळबळजनक खुलाशानंतर सरकार काय कारवाई करणार का आणि या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT