पुणे - गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर आलेला असताना पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीच्या विक्रीबाबतचा संभ्रम कायम आहे. यावर स्पष्टता येण्यासाठी व या निर्णयाची अंमलबजावणी कशी पद्धतीने केली जावी यासाठी सोमवारी (ता. ८) महापालिकेत बैठक होणार आहे.
गणेशोत्सवात घरोघरी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते, पुण्यात ही संख्या दीड लाखाच्या पुढे आहे. यामध्ये बहुतांश प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची विक्री केली जाते. या मूर्त्या आकर्षक असतात, पण त्यावर वापरलेला रंग आणि पीओपी मुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पालिकेस दोन महिन्यांपूर्वीच आदेश पाठवून पीओपीच्या गणेशमूर्ती विक्रीला बंदी घातली असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावरून गोंधळ असल्याने अद्याप बंदीच्या कार्यवाहीबाबत धोरण निश्चीत झालेले नाही.
महापालिकेने याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाला पत्र पाठवून पीओपीच्या बंदीची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन मागवले होते. कारवाई करताना मूर्तीची पावित्र्य राखणे, विक्रेत्यावर दंडात्मक कारवाईसाठी रक्कम किती असावी, गुन्हे कोणत्या स्वरूपाचे दाखल करावेत याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे. पण अद्यापपर्यंत पालिकेस कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे यासंदर्भात घनकचरा विभाग, पर्यावरण विभाग आणि प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी महापालिकेत बैठक होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.