शिनोली (पुणे) : निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या माळीण घटनेला आज सहा वर्ष पूर्ण होत आहेत. या दुर्देवी दुर्घटनेत ४४ कुटुंबातील १५१ लोक दगावले गेले. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील माळीण या दुर्गम गावात ३० जुलै २०१४ रोजी रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि ४० कुटुंबातील १५१ लोक ढिगाऱ्याखाली सापडून मयत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले, तर गावातील ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले.
या घटनेनंतर शासकीय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगाऱ्याचे खोदकाम केले व १५१ मृतदेह बाहेर काढले. या आठ दिवसांत विविध नेत्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. सरकारकडून मयतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे साडेआठ लाख रूपये देण्यात आले व विविध योजनांमधून मदत करण्यात आली. तसेच, दुर्घटना घडल्यानंतर अडिच वर्षात कायमस्वरूपी पुनर्वसन करून देण्यात आले. या नविन गावात ६८ घरे बांधण्यात आली असून, सर्व बारा मुलभूत सेवासुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र, २४ जुन २०१८ रोजी झालेल्या पहिल्याच पावसात या नविन गावाची दैना उडाली. मात्र, नविन माळीणचा अजूनही कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटला नाही. गावात सर्व सुखसोई झाल्या, परंतु पिण्याच्या पिण्याचा सर्वांत मोठा प्रश्न अजूनही सहा वर्षे झाली तरी सुटला नाही. उन्हाळयात अजूनही माळीणकरांना डोक्यावर हंडा घेऊन लांबून लांबून पाणी अणावे लागते. तसेच, उर्वरीत सर्व लोकांना घरे मिळावीत, स्मृतीस्तंभावर सावलीसाठी पत्र्याचे शेड व्हावे, गावातील हनुमान मंदिरासमोर सभामंडप व्हावे, अशा काही मागण्या अजूनही प्रलंबीत आहेत.
या मागण्यांबाबत पंचायत समिती सभापती संजय गवारी व माजी उपसभापती व विद्यामान सदस्य नंदकुमार सोनावले यांनी सांगितले की, अतिशय सुंदर व कमी वेळात माळीणचे पुनर्वसन झाले, मात्र खुप प्रयत्न करूनही पाण्याचा बळकट स्त्रोत मिळाला नाही. माळीणला कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी नामदार दिलीप वळसे पाटील यांनी पायलडोह येथे मोठा तलाव बांधला आहे. या तलावातून माळीणला पाणी देण्याचे नियोजन असून, त्यासाठी बुब्रा नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत. याव र्षीच्या उन्हाळयात माळीणकरांना पाण्यासाठी फिरावे लागणार नाही.
दरम्यान, कोरोनाचे संकटामुळे आज कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.